मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना पितामह पदवी मिळावी – प्रकाश शेंडगे

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मात्र

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना पितामह पदवी मिळावी – प्रकाश शेंडगे

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मात्र तरीसुद्धा १० फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणासाठी बसणार आहेत. मराठा आरक्षण (Maratha Reservation) अध्यादेशाच्या अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी यासाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत. मनोज जरांगे यांनी आता असे एक उपोषण केलं पाहिजे की, उभ्या भारतातल्या शेतकऱ्यांना कुणबी दाखले द्या. म्हणजे संपूर्ण देश हा कुणबीमध्ये (Kunbi) जाईल आणि मनोज जरांगे यांना पितामहची डिग्री मिळेल, असे म्हणत प्रकाश शेंडगे यांनी मनोज जरांगे यांना टोला लगावला आहे.

मराठा समाजाच्या काही युवकांकडून ओबीसी समाजाच्या व्यावसायिकांवरती बहिष्कार घालण्याची भाषा केली जात आहे. मात्र, देशातील न्हावी समाजाने जर मराठा समाजावर बहिष्कार घातला तर यांना डोक्यातील उवा मारत बसाव्या लागतील. त्यामुळे मराठा समाजाने बहिष्काराची भाषा करू नये, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावर बोलताना भुजबळ म्हणाले, आम्ही भुजबळ साहेब यांना राजीनामा देऊ नका, अशी विनंती केली आहे. मंत्रिमंडळात राहून हा लढा आपण दिला पाहिजे. ते ओबीसींचे (OBC) नेते आहेत, असे शेंडगे म्हणाले.महाराष्ट्र सरकारने मनोज जरांगे यांची फसवणूक केली का याचे मराठा समाजाने उत्तर द्यावे. आता सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. कोणी खोटी माहिती देण्याचा प्रयत्न केला तर आधार कार्ड नंबर खरा दिला आहे. त्याला बँक खातसुद्धा लिंक करण्यात आले आहे. जी खोटी माहिती दिली त्यावर आणि लिहून घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कॅबिनेटमध्ये करा, अशी मागणी शेडगेंनी केली आहे.

२०२४ मध्ये संजय गायकवाडला लाथा घाला. तसेच २०२४ मध्ये ओबीसी मुख्यमंत्री आणा. बहुजनांचे सरकार आणा. यांच्या घरात मुले जन्माला आले तरी ते आमदार, खासदार होऊन जन्माला येतात. मराठ्यांचा आता सरपंचही होणार नाही, आमदार खासदार तर दूरचीच गोष्ट आहे. आता एकही निवडणूक (Election) सोडायची नाही. सर्व आपण जिंकायच्या आहेत. बोगस कुणबी आरक्षण घेतले जात आहे. न्यायालयातील लढाई, रस्त्यावरील आणि राजकीय अशा तीन लढाई आपल्याला लढायच्या आहेत,असे प्रकाश शेंडगे शनिवारी पार पडलेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यात म्हणाले.

हे ही वाचा:

JEE Mains 2024 : परीक्षेच्या वेळापत्रकात करण्यात आले बदल, नोंदणी आणि तारखांबाबत घ्या सविस्तर जाणून…

सरकारने नियम डावलून केलेल्या नियुक्त्या रद्द कराव्यात, वडेट्टीवार यांची मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version