spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला खुलासा

विधानपरिषदेच्या अर्थसंकल्प अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे.

विधानपरिषदेच्या अर्थसंकल्प अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आज दोन्ही सभागृहांमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी मनोज जरांगे यांची SIT चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याच मुद्द्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानपरिषदेत म्हणाले की, मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नसल्याचे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना आधीच स्पष्ट सांगण्यात आले होते, असा खुलासा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही असे सांगितल्यानंतर जरांगेंनी सगेसोयरेचा मुद्दा समोर आणला आला आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. त्यांची टिंगल टवाळी कोणी केली याबाबत मी काही बोलणार नाही. मराठा समाजाला आरक्षण देत असताना मनोज जरांगे यांनी कुणबी दाखले देण्याची मागणी केली होती. त्यानंतर यंत्रणा लावून कुणबी नोंदी शोधून काढल्या. या नोंदी शोधण्यासाठी १९६७ पूर्वीच्या कायद्याचा आधार घेतला होता. शिंदे समितीचे काम चांगले आहे असे स्वतः मनोज जरांगे म्हणाले होते. सरकारने मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही हे आधीच सांगितले होते. त्यानंतर सगेसोयऱ्यांचा मुद्दा चर्चेत आणला. त्यांच्या मागण्या सातत्याने बदलत आहेत. ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

मराठा समाजाला सरसकट ओबीसींमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. त्यानंतर त्यांच्या मागणीमध्ये बदल होऊन त्यांनी पुढे सरसकट ऐवजी सगेसोयरेचा कायदा करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट मराठा आरक्षण देता येणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सांगितले होते. मराठा समाजाला कोर्टात टिकणारे आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आपण आरक्षण दिले. समाजावर अन्याय न करता आम्ही आरक्षण दिले आहे. सह्याद्रीवर घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये एकमताने आरक्षण देण्याचा निर्णय झाला, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

हे ही वाचा:

आंतरवली सराटीमध्ये झालेल्या लाठीमारावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

देवेंद्र फडणवीस यांनी कोणावर निशाणा साधला?, जरांगे यांच्या मागे कोण…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss