भाजपच्या दीपमोहत्सवात मराठी कलाकारांची चेष्टा – सचिन अहिर

भाजपच्या दीपमोहत्सवात मराठी कलाकारांची चेष्टा – सचिन अहिर

शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी खळबळजनक ट्विट केले आहे, वरळीतीळ जांबोरी मैदानातं भाजप ने “मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव” हा कार्यक्रम आयोजित केला होता या भाजप आयोजित कार्यक्रमात भाजपने जेष्ठ कलाकार गायक राहुल देशपांडे यांचा अपमान केल्याचा आरोप सचिन अहिर यांनी केला आहे. कार्यक्रमात राहुल देशपांडे यांचं गाणं थांबवून अभिनेता टायगर श्रॉफचा सत्कार केल्याचा आरोप सचिन अहिर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.

सचिन अहिर यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांन लिहिले कि , ‘हाच का मराठी कलाकारांचा सन्मान, भाजप आयोजित मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव जांबोरी मैदान, वरळी येथे…मराठी कलाकारांची चेष्टा…’

भाजप नेते आशिष शेलार यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देत सांगितले कि ‘उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे जावं. त्यांनी आपल्या पक्षाचं नाव रडकी सेना असं ठेवावं. ते स्वत: कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन करत नाहीत. कार्यक्रमात कोणाचाही अपमान झालेला नाही. मराठी माणसांच्या मराठमोळ्या दीपोत्सवामध्ये बॉलिवूडमधील कलाकार देखील येत आहेत, हा मराठी माणसांसाठी अभिमानाचा विषय आहे. ‘

नेमकं या कार्यक्रमात झाला तरी काय? असा प्रश्न पडतो , सचिन अहिर यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओत असादिसून आल कि,राहुल देशपांडे हे गाणं सादर करत असतानाच कार्यक्रमामध्ये टायगर श्रॉफचे आगमन झाले . त्यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक पाच मिनीटांचा ब्रेक घेण्याबाबत घोषणा करतात. याच वेळी राहुल देशपांडे हे सूत्रसंचालकांना सांगतात की, जर ब्रेक घेतला तर पुढे मी गाणं सादर करणार नाही. याबाबत कार्यक्रमाच्या आयोजकांबरोबर चर्चा होते तेव्हा राहुल देशपांडे म्हणतात की, ‘२० मिनीटांमध्ये मी गाणं सादर करतो. त्यानंतर तुम्हाला जे करायचं असेल ते तुम्ही करु शकता.’ पण त्यानंतर देखील स्टेजवर टायगर श्रॉफचा सत्कार केला जातो.

हे ही वाचा:

मुंबईत भास्कर जाधव यांच्याविरोधात भाजपचे बॅनर; ‘शोधून आणणाऱ्यास ११ रुपयांचे बक्षीस…!”

मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांची आत्महत्या, २३ व्या मजल्यावरुन उडी मारून जीवन संपवलं

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version