Tuesday, September 24, 2024

Latest Posts

… मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होतोय; नितेश राणेंचा आरोप

भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी बिल्डरांकडून जनतेला वेठीस धरण्यावरुन आदित्य ठाकरे (Shiv Sena Aaditya Thackeray) आणि शिवसेनेवर टीका केली आहे.

भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी बिल्डरांकडून जनतेला वेठीस धरण्यावरुन आदित्य ठाकरे (Shiv Sena Aaditya Thackeray) आणि शिवसेनेवर टीका केली आहे. यासंदर्भात नितेश राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र लिहिलं आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मुंबईतल्या विकासकांबाबत (Mumbai Real Estate and Developers) आक्षेप नोंदवलाय. राणे यांनी पत्रात म्हटलं आहे की, पुर्नविकास नियंत्रण नियमावली अंतर्गत भाडेकरू तथा एसआरएमधील झोपडपट्टी धारक खासगी विकासकांची नेमणुक करतात. या पद्धतीच्या अनेक पुर्नविकास प्रकल्पांमध्ये विकासक एक ते दिड वर्षांचे पर्यायी जागेचे भाडे देणे कबूल करतात.परंतु अनेक गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये अनेक विकासकांची कामे रखडल्याने त्यांनी भाडेही देणे बंद केले आहे, असं राणे यांनी म्हटलं आहे.

नितेश राणे यांनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, मनपाच्या निवडणूका जवळ आल्या आहेत आणि परत सत्ताधारी आदित्यसेनेनं मुंबई महाष्ट्रापासून तोडणार आणि मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करणार अशा उलटा बोंबा मारणं सुरू केले आहे. परंतु वास्तविक यांच्या जवळच्याच असलेल्या टक्केवारी मिळवून देणाऱ्या विकासकामुळे मुंबईकर नाईलाजास्तव मुंबईतून हद्दपार झाला आहे.

राणेंनी पत्रात म्हटलं आहे की, एका बाजूला कोविडमुळे मराठी बांधवांची रोजीरोटी केली आणि दुसऱ्याबाजूला मुंबईतील मराठी माणसाला आपल्या आयुष्यातील सहा सहा तास वसई विरारच्या प्रवासात घालवावे लागतात. आहे ते घर विकासकाने अडवून ठेवलंय आणि भाडे मिळण्याअभावी घरातून हकालपट्टी होतेये. काही ठिकाणी तर इमारत तयार असूनही ना इमारत ताब्यात मिळतेय ना हक्काचे भाडेही मिळतेय. त्यामुळे नाईलाजास्तव मराठी कुटुंब आपले हक्काचे घर विकासकला किंवा एजंटला स्वत: दरात विकण्यास बाध्य होतात, असा आरोप राणे यांनी केला आहे. तसेच टक्केवारी देणाऱ्या आणि जनतेला वेठीस धरणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी या पत्रातून नितेश राणे यांनी केली आहे.

हे ही वाचा:

“मुन्नाभाईचं काळीज कळायला मामूला…”, मनसेचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

… ह्या बातम्या परत कधीच वाचायला लागू नयेत; राज ठाकरेंनी सोशलमिडियाद्वारे केला संताप व्यक्त

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss