‘मशाल’ उद्धव ठाकरेंन सोबतच; समता पक्षाची याचिका हायकोर्टानं फेटाळली

‘मशाल’ उद्धव ठाकरेंन सोबतच; समता पक्षाची याचिका हायकोर्टानं फेटाळली

आधी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ‘धगधगती मशाल’ ठाकरेंना मिळाली, त्यानंतर ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असतानाच आता ‘मशाल’ही अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली होती. जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केलेल्या समता पक्षाने (Samata Party) मशाल हे आपले निवडणूक चिन्ह असल्याचा दावा केला होता. मात्र, दिल्ली हायकोर्टाने ठाकरे गटाला दिलासा दिला आहे.

समता पक्षाच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी म्हटलं की, “मशाल चिन्हावर आपला दावा सिद्ध करण्यास समता पक्षा अपयशी ठरला आहे. कोणताही अधिकार नसताना याचिकाकर्ते चिन्ह रद्द करण्यासाठी आदेश मागू शकत नाही.” यासोबतच २००४ मध्येच समता पक्षाची मान्यता रद्द करण्यात आली होती हे सुनावणीदरम्यान समोर आलं. आणखी एक बाब म्हणजे समता पक्षाने २०१४ मध्ये पेटती मशाल चिन्हाखाली निवडणूक लढवली होती, तर २०२० ची निवडणूक वेगळ्या चिन्हावर लढली होती. दरम्यान समता पक्षाची स्थापना १९९४ मध्ये जॉर्ज फर्नांडिस आणि नितीश कुमार यांनी केली होती.

१९९६ पासून हे चिन्ह आपल्याडे असल्याचे समता पार्टीने दावा केला आहे. तर दुसरीकडे अंधेरीपूर्व निवडणूकीत आपला उमेदवार देण्याची घोषणाही समता पार्टीने केलेला आहे. “२००४ साली समता पार्टीची राज्यपक्ष म्हणून मान्यता काढून घेत असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे,” असे समता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष त्रुनेश देवळेकर यांनी यापूर्वीच सांगितले होते.

केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव वापरण्यास परवानगी दिलेली आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव मिळालेलं आहे. दुसरीकडे आयोगाने ठाकरेंना मशाल चिन्ह दिलेलं आहे. तर शिंदेंना ढाल तलवार ही निशाणी देण्यात आली आहे.

हे ही वाचा :

शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण निशाणी गोठवण्याचं पाप यांनी केलं; भास्कर जाधव

Congress President Election : मोठी बातमी ! मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version