spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मला देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता – अजित पवार

गेल्या महिन्याभरापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर आज मुहूर्त हा मिळाला आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) हा होणार आहे.

मुंबई :- गेल्या महिन्याभरापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर आज मुहूर्त हा मिळाला आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) हा होणार आहे. आज सकाळी ११ वाजता राजभवनावर मंत्रिमंडळाचा विस्तार हा होणार आहे. या मध्ये १८ ते २० आमदार पहिल्या टप्प्यात शपत घेणार असल्याची शक्यता हि वर्तवली जात आहे. परंतु अद्यापही अद्यापही मंत्रिमंडळाची नावे हि स्पष्ट केली नाहीत. मंत्रिमंडळायच्या या विस्तारत अखेरच्या क्षणी नक्की कोणाला पदे मिळणार याबाबत अनेकांना उत्सुकता हि लागली आहे.

दरम्यान या वरून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी खोचक टीका केली आहे. आमदार नाराज होऊ नये आणि अधिवेशन व्यवस्थित चालावं म्हणूनच तात्पुरता मंत्रीमंडळ विस्तार होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुढे त्यांनी आमदाराच्या नाराजीवरही भाष्य केलं आहे. “कुणांचंही सरकार आलं तरी आमदार नाराज होतात. मंत्रीमंडळाचा विस्तार होतो, तेव्हा अनेकांना वाटतं की आपल्या मंत्रीपद मिळावं, ज्यांना संधी मिळत नाही. ते नाराज होतात. आज होणारा मंत्रीमंडळ विस्तार हा पूर्ण नाही, अशी माहिती आहे. कदाचित आमदारांची नाराजी दूर व्हावी आणि अधिवेशन व्यवस्थित चालावं, यासाठी मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार होत नसावा, असा माझा अंदाज आहे”, असेही ते म्हणाले. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार हा होतो तेव्हा नाराजीनाट्य हे होतच असं देखील तेव्हा त म्हंटले.

“आज सकाळी ११ वाजता मंत्रीमंडळ विस्तार आहे. यासंदर्भात मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचा फोन आला होता. त्यामुळे विरोधी पक्षनेता म्हणून मी हजर राहणार आहे” असा खुलासा देखील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.

 

हे ही वाचा :-

अखेर आज मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त, परंतु शिंदे यांच्याकडून सस्पेन्स कायम

 

Latest Posts

Don't Miss