spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कदाचित त्यांचे ब्लड प्रेशर वाढले असेल त्यामुळे ते असे काही तरी बोलत आहेत; छगन भुजबळांची जरांगेंवर टीका

मराठा आरक्षणाच्या पुढील निर्णयासाठी मनोज जरांगे यांनी आज आंतरवली सराटीमध्ये निर्णयक बैठक बोलावली होती.

मराठा आरक्षणाच्या पुढील निर्णयासाठी मनोज जरांगे यांनी आज आंतरवली सराटीमध्ये निर्णयक बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मनोज जरांगेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला सलाईनमधून विष देण्याचा आणि माझं एन्काऊंटर करण्याचा फडणवीसांचा डाव आहे, असे जरांगे म्हणाले. त्यांनी केलेल्या या गंभीर आरोपानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. देवेंद्र फडणवीसांवर आरोप केल्यानंतर मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. यावरूनच आता मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगेंवर निशाणा साधला आहे.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले, मराठा समाजाला विधिमंडळाने स्वतंत्र आरक्षण एकमताने जाहीर केले आहे. सर्व आमदार सर्व पक्षांनी यावर एकमत दिले आहे. सर्व विरोधी पक्षाचे नेत्यांनी सांगितले होते की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याचे काम करा त्या प्रमाणे ते झाले आहे. त्यानंतर सुद्धा मनोज जरांगे आदळ आपट करत आहेत. याचे नेमकं कारण काय? आता त्यांचेच लोक त्यांच्या विरोधात जाऊन बोलत आहेत. त्यामुळे कदाचित आता त्रस्त होऊन त्यांनी हे अकांड तांडव सुरु केले असेल, असे छगन भुजबळ म्हणाले. मनोज जरांगे यांचे पितळ उघडल पडलं आहे. नी केलेल्या गुप्त बैठका, फिरवलेले निर्णय, मराठा समाजाला त्यांनी जे काही गुमराह केलंय, त्यामुळे आता त्यांचेच लोक बोलायला लागलेले आहेत. कदाचित त्यांचे ब्लड प्रेशर वाढले असेल आणि त्यामुळे ते असे काही तरी बोलत आहेत, अशी टीका छगन भुजबळांनी केली आहे.

तुम्ही अगोदर तुमची तब्येत सांभाळा. मला फार आश्चर्य वाटतं उपोषण करत असूनसुद्धा त्यांचा आवाज फार खणखणीत आणि मोठा आहे. हे कसं काय जमतं हे कसे काय आहे आणि ते १० लोकांना सुद्धा ऐकत नव्हते. एवढी शक्ती उपोषणकर्त्याला कशी आली, हे वैद्यकीय क्षेत्रातील मोठे आश्चर्य आहे, असे भुजबळ म्हणाले. मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना झाल्यानंतर दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नालेवाडी गावापर्यंत पोहचले आहेत. सागर बंगल्यावर जाण्याच्या भूमिकेवर मनोज जरांगे ठाम आहेत.

हे ही वाचा:

मनोज जरांगेंना स्क्रिप्ट देतय कोण? याची पार्शवभूमी काय आहे? आमदार नितेश राणे

उलटा निर्णय देणारे, यांना कोण निवडून आणणार; चंद्रकांत खैरेंची राहुल नार्वेकरांवर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss