Measles Disease : मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश; गोवर लसीकरणाच्या जनजागृतीसाठी विविध धर्मगुरूंची मदत घ्या

गेल्या ३ वर्षांच्या तुलनेत या वर्षामध्ये गोवर संक्रमित बालकांची संख्या तब्बल ६ पटीने वाढली असून २६ वेळा संसर्गाचा उद्रेक झाला आहे. राज्यातील गोवरच्या संख्येतील वाढ पाहता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबईसह राज्यातील गोवर परिस्थितीचा आढावा घेतला.

Measles Disease : मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश; गोवर लसीकरणाच्या जनजागृतीसाठी विविध धर्मगुरूंची मदत घ्या

गेल्या ३ वर्षांच्या तुलनेत या वर्षामध्ये गोवर संक्रमित बालकांची संख्या तब्बल ६ पटीने वाढली असून २६ वेळा संसर्गाचा उद्रेक झाला आहे. राज्यातील गोवरच्या संख्येतील वाढ पाहता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबईसह राज्यातील गोवर परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबई महानगरातील गोवरचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर भर देऊन रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या बालकांची विशेष काळजी घ्यावी. गोवरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणावे. लसीकरणाविषयी जाणीवजागृतीसाठी विविध धर्मगुरूंची मदत घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, लसीकरणाच्या अभावी बालकांना गोवरचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ज्या भागात गोवरचा उद्रेक होत आहे तेथे तातडीने लसीकरणाची मोहिम मुंबई महापालिकेने हाती घ्यावी. लसीकरणाविषयी जाणीवजागृती करण्यासाठी स्थानिक नेते, विविध धर्मगुरू यांची मदत घ्यावी. गोवरची साथ नियंत्रण आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. ज्या बालकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे त्यांची विशेष काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला दिले.

मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील गोवर साथ नियंत्रणाबाबत आढावा बैठक घेतली. मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी यावेळी मुंबईतील गोवर आजाराच्या प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लसीकरणावर अधिक भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, घरोघरी जाऊन सर्वेक्षण होणार असेही सांगितले आहे. तसेच, जनमानसात लसीकरणाबाबतीत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक प्रमाणावर लोक प्रबोधन करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

राज्यातील गेल्या चार वर्षातील गोवरच्या रूग्णांची परिस्थिती पाहता यंदाची परिस्थिती मात्र चिंताजनक आहे. २०१९ मध्ये गोवरचा उद्रेक ३ वेळा झाला. तर २०२० मध्ये ही संख्या २ वेळा झाला. अगदी मागच्या वर्षापर्यंत म्हणजेच २०२१ मध्ये गोवरचा उद्रेक केवळ एकदाच झालेला. मात्र, यावर्षी २०२२ मध्ये गोवर उद्रेकाची संख्या तब्बल ६ पटीने वाढली असून २६ वेळा संसर्गाचा उद्रेक झाला आहे. यामध्ये ६४२१ संशयित रूग्ण आहेत. तर मुंबईत आठ बालकांचा गोवरमुळे मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:

Jitendra Awhad: विनयभंगाच्या प्रकरणानंतर ‘या’ ट्विटमुळे; जितेंद्र आव्हाड पुन्हा चर्चेत

राज्यातील पदभरतीचा मार्ग अखेर मोकळा; ‘या’ कंपन्या घेणार परीक्षा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version