Sanjay Raut यांना १५ दिवसांची कैद, कोर्टाच्या निकालानंतर Medha Somaiya यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Sanjay Raut यांना १५ दिवसांची कैद, कोर्टाच्या निकालानंतर Medha Somaiya यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबाबत मोठी बातमी आली असून न्यायालयाने त्यांना १५ दिवसांची कैद सुनावण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची पत्नी मेधा सोमय्या (Megha Somaiya) यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात न्यायालयाने मोठा निर्णय देत संजय राऊत यांना दोषी ठरवले आहे. शिवडी न्यायालयाने हा निर्णय दिला असून संजय राऊत यांना १५ दिवसांच्या कैदेसह २५ हज़ार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. मीरा भाईंदर महापालिकेतील (Mira Bayandar Municipal Corporation) शौचालय भ्रष्टाचार प्रकरणावरून संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर आरोप केले होते. त्यावर मेघा सोमय्या यांनी राऊतांविरुद्ध कोर्टात अब्रूनुकसानीचा दावा ठोकला होता.

२०२२ साली संजय राऊत यांनी मेघा सोमय्या यांच्यावर मीरा भाईंदर येथील एका शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याआचा आरोप केला होता. याविरोधात मेघा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात अब्रुनुकसाणीचा खटला दाखल केला होता. या निकालाची सुनावणी पूर्ण होऊन निकाल राखून ठेवण्यात आलं होता. आज (गुरुवार, २६ सप्टेंबर) या प्रकारणाचा निकाल लागला आणि न्यायालयाने संजय राऊतांना दोषी ठरवले. न्यायालयाने संजय राऊतांना २५ हजारांचा दंड आणि १५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. संजय राऊत यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात असला तरी १५ दिवसांची कैद असल्याने संजय राऊत जामिनास पात्र आहेत. सुनावणीदरम्यान संजय राऊत कोर्टात उपस्थित नव्हते. परंतु कोर्टाने नियोजित वेळेत निकलाचे वाचन पूर्ण केले. आता संजय राऊत यांना रीतसर न्यायालयासमोर हजर व्हावे लागेल. त्यानंतर कोर्ट त्यांना जामीन मंजूर करण्याची शक्यता आहे. यावर आता मेधा सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली असून ‘माझ्या कुटुंबावर कोणी आच आणायचा प्रयत्न केला तर मी एक सामान्य गृहिणी जशी लढते तशीच लढले,” असे वक्तव्य त्यांनी केले आहे. तसेच, अश्याप्रकारची बेताल वक्तव्य करणाऱ्याला यापुढे चाप बसेल,” असेही त्या म्हणाल्या.

काय म्हणाल्या मेधा सोमय्या?

माध्यमांशी संवाद साधत मेधा सोमय्या म्हणाल्या, “सगळ्यात पहिल्यन्दा मला वाटत कि आजही भारतातील न्यायव्यवस्था रामशास्त्री प्रभुणे यांच्या पावलावर पाऊल टाकून चालत आहे. त्यांना मी मनापासून धन्यवाद देते. माझया कुटुंबावर, माझया मुलावर कोणी आच आणायचा प्रयत्न केला तर एक सामान्य गृहिणी जशी लढते तशी मी लढले. मला न्यायालयाने योग्य तो न्याय दिला. मी शिक्षिका आहे आणि समाजसेवाही करते. या दोन्ही गोष्टींचा सन्मान नायायालयाने केला, असे वाटते. मी न्यायालयाच्या निकालावर समाधानी आहे. शिक्षा होणे महत्वाचे आहे. अश्यप्रकाराची बेताल वक्तव्ये करणाऱ्याला यामुळे चाप बसेल,” असे मत त्यांनी यावेळी वक्त केले.

नेमके प्रकरण काय?

संजय राऊत यांनी २०२ साली मेधा सोमय्या यांच्यावर मीरा भाईंदर महापालिकेत शौचालय घोटाळा केल्याचे आरोप केले होते. टायनानंतर किरीट सोमय्या यांनी या आरोपाचे पुरावे देण्याचे आव्हान संजय राऊत याना दिले होते. मात्र संजय राऊत यांनी कोणतेही पुरावे न दिल्याणे राऊतांवर १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला होता. याबाबत किरीट सोमया याणी मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तसेच मानहाणी आणि बदनामीची नोटीस राऊतांना दिली होती. एक रुपयाचाहि घोटाळा झाला नसताना, घोटाळ्याचे कोणतेही पुरावे नसताना संजय राऊत यांनी फक्त बदनामीसाठी हा अपप्रचार केला, असा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला होता.

हे ही वाचा:

PM Modi Pune Visit Cancelled: मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे पंतप्रधान मोदींचा Pune दौरा रद्द

Akshay Shinde Encounter: CM Eknath Shinde, Devendra Fadnavis स्वतःला सिंघम समजतात, पण त्यांनी पुरावा नष्ट करण्याचे काम केलं: Sanjay Raut

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version