spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांची भेट; खोके नाही…

शिवसेना खासदार संजय राऊत (ShivSena MP Sanjay Raut) यांना हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. संजय राऊत यांच्या जामिनावरील सुनावणी २१ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा तुरुंगातील मुक्काम तूर्तास वाढला आहे. दरम्यान सत्र न्यायालयात लिफ्टजवळ संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Senior leader of NCP Eknath Khadse) यांची भेट झाली. खडसेंनी आस्थेवाईकपणे चौकशी केली असता ‘चिंता करु नका, सगळं ओके आहे’ असं राऊत म्हणाल्याचं खडसेंनी सांगितलं. यावेळी मंदाकिनी खडसेही सोबत होत्या.

यावेळी संजय राऊत म्हणाले की “ओके है सब, काही चिंता करू नका म्हणे, आताच बाहेर येणार म्हणे मी” असं खडसे म्हणाले. खोक्यासंदर्भात काही बोलले का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, “खोके नाही, ओके आहे बोलले” अशी मिश्किल टिपण्णी खडसेंनी केली. “राऊत साहेबांशी लिफ्टजवळ भेट झाली माझी, दोन मिनिटं ते बोलले, सब कुछ ओके है, तुम्ही काळजी करु नका” असं बोलल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितलं. खासदार संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना काल पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. तत्पूर्वी न्यायालयाच्या बाहेर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अंधेरी पोटनिवडणुकीवरुन त्यांनी भाजपला लक्ष्य केलं तसेच राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला.

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती, त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या जामीनावर सुनावणी होती. आज जिल्हा सत्र न्यायालयात खासदार संजय राऊतांना आणण्यात आले होते, त्याच दरम्यान लिफ्ट जवळ संजय राऊत आलेले असतांना एकनाथ खडसे यांची भेट झाली आहे. एकनाथ खडसे हे देखील न्यायालयाच्या कामकाजाकरिता जिल्हा सत्र न्यायालयात आलेले होते, त्यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली. एकनाथ खडसे यांनी यावेळी बाहेर असेलेल्या माध्यम प्रतिनिधींना भेटीत संजय राऊत काय बोलले ही माहिती दिली आहे.

हे ही वाचा :

ठाकरेंमध्ये थेट हल्ला करण्याची हिंमत नाही ; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टिका

लवकरच येणार प्लॅनेट मराठीवर ‘बेबी ऑन बोर्ड’ नवीन सीरिज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss