spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महाराष्ट्र,कर्नाटक राज्यपालांच्या उपस्थितीत दोन राज्यांच्या समन्वयावर बैठक, पण संवेदनशील सीमावादावर चर्चाच नाहीच

महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा परस्परांमध्ये उत्कृष्ट समन्वय असून तो आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिल्या. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांच्या आंतरराज्यीय सामायिक मुद्यांबाबत कोल्हापूर येथील रेसिडेन्सी क्लब येथे दोन्ही राज्यांची आज समन्वय बैठक महाराष्ट्र व कर्नाटक राज्यपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी महाराष्ट्रातील सीमा भागातील पाच जिल्हे व कर्नाटक राज्यातील चार जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची उपस्थिती होती.

हेही वाचा : 

Maharashtra politices : सिल्लोडमध्ये आदित्य ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारली, मात्र श्रीकांत शिंदेंच्या सभेला पोलिसांची परवानगी

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी पुढे म्हणाले की, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सीमेलगतच्या जिल्ह्यात परस्परात चांगला समन्वय आहे. दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांच्या चर्चेतून ज्या काही समस्या राज्यस्तरावरुन सोडविल्या जाणे आवश्यक आहे.  त्याबाबत राज्य शासनाला सुचित करण्यात येईल, असे सांगून ही समन्वय बैठक पुढील काळात नक्कीच लाभदायक ठरेल असेही त्यांनी सुचित केले.

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सुरू आहे. याप्रकरणी नेहमीच दोघांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला तर आता हा संघर्ष मिटवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदाच या प्रश्नात मध्यस्थी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार आज कोल्हापुरातील रेसिडेन्सी क्लब येथे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये मंथन बैठक होत झाली. या बैठकीला दोन्ही राज्याचे राज्यपाल तसेच सीमा भागातील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी सहभागी होणार असून दोन्ही राज्यातील सीमा भागातील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी काल रात्रीच कोल्हापुरात दाखल झाले होते. महाराष्ट्र आणि कर्नाटकची अशाप्रकारे व्यापक आणि संयुक्त बैठक या आधी कधीच झाली नव्हती.

शाहरुख खानने ‘पठाण’ चित्रपटासाठी शरीरावर घेतली इतकी मेहनत ; दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद

Latest Posts

Don't Miss