राज ठाकरे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला

राज ठाकरे दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्याला गेले असतांना भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे यांची सदिच्छा भेट घेतली आहे

राज ठाकरे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला

राज ठाकरे दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्याला गेले असतांना भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे यांची सदिच्छा भेट घेतली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या पक्षविस्तारासाठी आणि पुढची रणनिती ठरवण्यासाठी विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. त्यावर आता बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. राज ठाकरे माझे मित्र आहेत. ते दिलदार व्यक्ती आहेत म्हणून माझी त्यांच्यासोबत पक्की मैत्री आहे. मी त्यांना निमंत्रण दिलं होतं. नागपूरला आल्यानंतर तुम्ही आमच्या घरी या म्हणून… त्यामुळे ते आले होते. या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, असं बावनकुळे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : Grampanchayat Election Result : सर्वाधिक ग्रामपंचायतींवर कमळ, तर शिंदे गट व राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू

 

या वेळी माध्यमांशी बोलतांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, निकाल मत पेटीतूनच बाहेर येईल, त्या वेळी समजेल कोणाचा कुठे प्रभाव आहे. या वेळी बोलतांना बावनकुळे यांनी विश्वास व्यक्त केला, कि ग्रामपंचायतीत सर्वात जास्त जागा हे भाजपाच्या निवडून येतील. अनेक सरपंच जनतेतून निवडून येण्याचा निर्णय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्या निर्णयाचं स्वागत अनेक लोकांनी केला आहे.

कुठे भाजपाचे उमेदवार आहेत तर कुठे एकनाथ शिंदे यांचे, दोन्ही पक्षांचे उमेदवार बहु मतांनी झिंकून येथील मला जनतेवर विश्वास आहे असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. जे.एन.एफ.सी कोर्टाची तारिक असल्याचे सांगितले. महाविकास आघाडी च्या दरम्यान गरिबांनाजे मोफत अण्णाची योगन होती ती योग्य यापद्धतीने राबवली नाही. केंद्र सरकारकडून राज्यसरकाला धान्य दिलं जात होतं पण त्यांना ते योग्य पद्धतीने राबवता आलं नाही. त्यावेळी महाविकास आघाडी झोपत होती अशी टीका बावनकुळे यांनी केली.

हे ही वाचा :

बुलेट ट्रेनच्या मुद्द्यावरून रोहित पवारांनी लगावला भाजपला टोला, म्हणाले…

 

Exit mobile version