spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नाही; महिलांना भरपगारी रजा दिल्या जाऊ नये, स्मृती इराणींचे वक्तव्य

मासिक पाळीच्या काळात महिलांना रजा मिळावी कि नाही? यावर बुधवारी (१३डिसेंबर) संसदेत प्रश्न विचारण्यात आला होता.

मासिक पाळीच्या काळात महिलांना रजा मिळावी कि नाही? यावर बुधवारी (१३डिसेंबर) संसदेत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी (Smruti Irani) यांनी उत्तर देत हा विचार फेटाळून लावला. महिलांना येणारी मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नाही, त्यामुळे सरकार अशा कोणत्याही भरपगारी रजेचा विचार करत नसल्याचे स्मृती इराणी यांनी सांगितले आहे.

राष्ट्रीय जनता दलचे खासदार मनोज कुमार झा या राज्यसभेत भरपगारी मासिक पाळी रजेबाबत प्रश्न विचारला होता. विचारलेल्या प्रश्नाला उत्तर स्मृती इराणी म्हणाल्या, मासिक पाळी हा महिलांच्या जीवनाचा एक भाग आहे, हे कोणतंही अपंगत्व नाही. मासिक पाळीकडे अपंगत्व म्हणून पाहू नये. महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान सुट्टी दिल्यास भेदभावाला प्रोत्साहन दिलं जाईल. मासिक पाळीबद्दल विशिष्ट दृष्टिकोन असल्यामुळे महिलांना समान संधी नाकारल्या जातात, असं म्हणून बाऊ करु नये, असे स्मृती इराणी म्हणाल्या. भरपगारी मासिक पाळी रजेबाबत बोलणारे मनोज कुमार झा हे राष्ट्रीय जनता दलाचे खासदार आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाच्या सरकारविरोधातील आक्रमकतेसाठी ओळखले जातात.

मासिक पाळीमध्ये भरपगारी रजा द्याची कि नाही यावर अनेक वाद भारतामध्ये सुरु आहेत. स्पेनमध्ये महिला आणि मुलींना मासिक पाळीच्या वेदना होत असताना सुट्टी दिली जाईल, अशी तरतूद करण्यात आली आहे. असे कारण स्पेन हा पहिला देश आहे. पण भारतामध्ये मासिक पाळी रजेबाबत सरकारचा सध्या तरी काहीच हेतू नाही. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी ८ डिसेंबरला याबाबत प्रश्न विचारला असता सरकारने त्यांनाही तेच उत्तर दिले होते. ऑक्टोबरमध्ये मात्र सरकारने मासिक पाळीच्या स्वच्छता धोरणाचा मसुदा जारी केला होता, कामाच्या ठिकाणी मासिक पाळीच्या काळात सुट्टीच्या तरतुदींचे समर्थन करण्यात आले होते.

हे ही वाचा:

दाऊदच्या भागीदाराला पैसे पुरविणाऱ्या रशेश शहाच्या एडलवाईसची चौकशी करणार, फडणवीसांची घोषणा

तुम्हाला जेवताना सोडा पिण्याची सवय आहे का ? तर मग हे वाचा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss