spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

म्हात्रेताई, मिंधे गटाला खूश करण्यासाठी फोटो टाकला काय? – रुपाली पाटील

राष्ट्रवादीकडून शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट करण्यात आला होता. त्यानंतर आता शिंदे गटातील शितल म्हात्रें यांनी त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन खासदार सुप्रिया सुळे यांचा एक फोटो ट्विट करण्यात आला आहे. या फोटोमध्ये सुप्रिया सुळे यांच्या मागे मुख्यमंत्र्यांचा बोर्ड दिसत आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. हा फोटो मॉर्फ केलेला आहे. सुप्रिया सुळे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यामुळं याविरोधात आदिती नलावडे (Aditi Nalawde) यांनी वरळी पोलीस ठाण्यातील सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी शीतल म्हात्रेंवर बोचरी टीका केलीये. म्हात्रेताई, मिंधे गटाला खूश करण्यासाठी फोटो टाकला काय?, असा सवाल त्यांनी फेसबुक पोस्ट करुन विचारला आहे.

गद्दारांना क्षमा नाही. गद्दार फेम शीतल म्हात्रे ताई यांनी मिंधे गटाला खूश करण्यासाठी सुप्रिया सुळे यांची महिला असूनही जाणीवपूर्वक फॉर्म फोटो ट्विट करुन बदनामी केली आहे.अमृता फडणवीस यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यावर लगेच गुन्हा दाखल होत कारवाई होते. तीच तत्परता मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे दाखवतील का? त्यांच्यावर गुन्हा दाखल होणारच! त्यांनी तात्काळ माफी मागावी, अशी फेसबुक पोस्ट रुपाली पाटील यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे यांचा फोटो जर एडिट केल्याचा दावा राष्ट्रवादीकडून केल्यानंतर श्रीकांत शिंदे यांचा फोटो देखील एडिट केला असल्याचा दावा शितल म्हात्रे यांनी केला आहे. राष्ट्रवादीकडून पोलिसात दिलेल्या तक्रारीच्या विरोधात कायदेशीर सल्ला घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असंही शितल म्हात्रे यांनी म्हटलं आहे. शीतल म्हात्रे यांनी ट्विट केलेला फोटो पाहिल्याबरोबर आक्रमक प्रतिक्रिया नोंदवली आहे. शीतल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळे यांचा मॉर्फ फोटो पोस्ट केला आहे. सुप्रिया सुळेताईंची प्रतिमा मलीन करण्याच्या स्पष्ट हेतू या फोटोतून दिसत आहे. मुंबई पोलिसांनी त्वरित कारवाई करावी. तसेच शीतल म्हात्रे यांनी सुप्रियाताईंची माफी मागून पोस्ट डिलीट करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस कायदेशीर कारवाई करेल, असा इशाराच पक्षाच्या वतीने क्लाईड क्रास्टो यांनी दिला आहे.

हे ही वाचा:

India VS Australia: भारताचा ऑस्ट्रलियावर दणदणीत विजय

India VS Australia: भारताचा ऑस्ट्रलियावर दणदणीत विजय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss