मिलिंद नार्वेकर आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, मी भाग्यवान आहे की…

मिलिंद नार्वेकर आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, मी भाग्यवान आहे की…

काही दिवसांपासून शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर शिवसेना सोडून शिंदे गटात जाणार अशी चर्चा सगळी कडे रंगली आहे. त्यात शिवसेनेतून बंड करून शिंदे गटात सामील झालेले आमदार गुलाबराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या भाषणांमधून सांगितलं की मिलिंद नार्वेकर येत्या काही दिवसात शिंदे गटात सामील होणार आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपासून मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यापर्यंत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. ही चर्चा सुरू असताना मिलिंद नार्वेकर कुठे आहेत? असाही प्रश्न विचारला गेला. या चर्चांमध्ये आता स्वतः मिलिंद नार्वेकरांनी यांनी एक ट्वीट केलं आहे.

मिलिंद नार्वेकर आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “मी भाग्यवान आहे की, मला सरन्यायाधीश उदय लळीत, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, तिरुमला तिरुपती देवस्थानचे प्रमुख सुब्बा रेड्डी यांच्यासमवेत श्री व्यंकटेश्वरा स्वामी मंदिरातील ब्रह्मोत्सवाच्या पाचव्या दिवशी गरुड वाहन पुजेचा साक्षीदार होता आलं.”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही मिलिंद नार्वेकर शिंदे गटात येणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. मात्र, त्यांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलं. माध्यमांशी बोलतांना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “मिलिंद नार्वेकरांसारखे नेते असं काही करतील यावर कुणाचाच विश्वास नाही. कारण राज ठाकरे, नारायण राणे प्रचंड आरोप केले होते. त्यातूनही ते तावून सलाखून निघाले. आज ते तिरुपती सारख्या आध्यात्मिक संस्थेवर आहेत. त्यांची सद्बुद्धी नेहमीच चांगली असते. मात्र, आता ते शिंदे गटात जाणार की नाही याविषयी मला काहीही माहिती नाही.”

हे ही वाचा:

सचिन वाझे दर महिन्याला मातोश्रीवर १०० कोटी पाठवायचे, शिंदे गटाचा गंभीर आरोप

Big Boss 16: साजिद खान ते टीना दत्ता, जाणून घ्या बिग बॉस १६ मधील स्पर्धकांची पूर्ण यादी, एका क्लिकवर…

Follow Us

Exit mobile version