spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Milind Narvekar: शिंदे गटात सामिल होण्याच्या चर्चेला मिलिंद नार्वेकरांनी लावला पूर्णविराम, एक सूचक ट्वीट करत म्हणाले…

राज्यातील राजकीय संघर्ष कधी संपेल हे सांगणे कठीण आहे, कारण सध्या दसरा मेळाव्याबाबत उद्धव आणि शिंदे गटात खडाजंगी सुरू आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर हेही लवकरच शिंदे गटात सामील होणार असल्याची बातमी राजकीय वर्तुळात रंगात आहे.मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेचे सचिव असून ते उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात. अशा परिस्थितीत त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यास ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. काळ मुंबईतील वरळी परिसरात मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले. या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी शिंदे गटाचे सदस्यत्व घेतले. यामुळे देखील शिवसेना आता राजकीय संघर्षातून जात आहे. परंतू या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मिलिंद नार्वेकर यांनी सूचक ट्वीट केले आहे. मिलिंद नार्वेकर यांनी ट्वीट करत आपण शिवसेनेतच असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

हेही वाचा : 

IND vs SA: सामना जिंकल्यानंतरही रोहित शर्मा तणावात, डेथ ओव्हर्सच्या बॉलिंगबाबत म्हणाला…

मिलिंद नार्वेकर यांनी ट्वीट करत शिंदे गटातील प्रवेशाबाबत पूर्णविराम दिला आहे. मिलिंद नार्वेकर यांनी ट्वीट करत ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याची शिवतीर्थावर जय्यत तयारी सुरू असून काल रात्री या कामाची पाहणी केली असल्याचे म्हटले. त्याशिवाय, शिवाजी पार्क येथील असलेल्या बंगाल क्लबच्या दुर्गोत्सवास भेट दिली व माँ दुर्गेचे दर्शन घेतले असल्याचे ट्वीट नार्वेकर यांनी केले.

‘राजकुमार’ गाण्याला मिळतोय प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

दरम्यान, शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेकडून दसरा मेळाव्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. दसरा मेळाव्यासाठीच्या स्टेजची उभारणी सुरू करण्यात आली आहे. आज शिवसेना भवनमध्ये विभागप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने जबाबदारीचे वाटप करण्यात येणार आहे.

Bigg Boss Marathi 4  : मराठी बिग बॉसच्या घरात मुख्यमंत्री शिंदेंच्या नावाची हवा, महेश मांजरेकरांचं मोठे वक्तव्य

Latest Posts

Don't Miss