spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांनी पक्षचिन्हाबाबत सूचक ट्विट

निवडणूक आयोगाकडून शनिवारी दि ८ ऑक्टोबर रोजी शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे. आता निवडणूक आयोगाचा पुढील निर्णय येईपर्यंत शिंदे गट आणि ठाकरे गटाला धनुष्यबाण या चिन्हाचा वापर करता येणार नाही.

निवडणूक आयोगाकडून शनिवारी दि ८ ऑक्टोबर रोजी शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे. आता निवडणूक आयोगाचा पुढील निर्णय येईपर्यंत शिंदे गट आणि ठाकरे गटाला धनुष्यबाण या चिन्हाचा वापर करता येणार नाही. सोबतच शिवसेना हे नाव देखील वापरता येणार नाहीये. हा उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर आता ठाकरे गट कोणतं चिन्ह निवडणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकरांकडून नव्या चिन्हाबाबत सूचक ट्विट करण्यात आले आहे.

मिलिंद नार्वेकर यांनी नव्या चिन्हाबाबत सूचक ट्विट केले आहे. मिलिंद नार्वेकर यांनी वाघाचा फोटो ट्विट केला आहे. वाघाचा फोटो ट्विट करून त्या फोटोमध्ये आमचे चिन्ह श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे असा मजकूर आहे. नार्वेकरांच्या ट्विटनंतर शिवसेना वाघाचे चिन्ह मागणार का? या चर्चेला उधाण आलं आहे.

 दरम्यान दुसरीकडे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शेअर करत जिंकणारच, असा निर्धार व्यक्त केला आहे. तर आदित्य ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. ‘ लढणार आणि जिंकणारच! आम्ही सत्याच्या बाजूने! सत्यमेव जयते! असे ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केले. त्याशिवाय, इन्स्टाग्रामवर हरीवंशराय बच्चन यांची ‘अग्निपथ’ ही कविता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या फोटोसह पोस्ट केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uddhav Thackeray (@uddhavthackeray)

 निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे. त्यामुळे आता शिंदे गट किंवा उद्धव ठाकरे यांच्या गटाला धनुष्यबाण या चिन्हाचा वापर करता येणार नाही. अंधेरी पूर्व विधानसेभेच्या पोटनिवडणुकीसाठी आता दोन्ही गटाला मुक्त चिन्हांमधल्या ३ चिन्हांची निवड करून ते निवडणूक आयोगाकडे सादर करावे लागणार आहेत. अंधेरी पूर्व विधानसभेसाठी दोन्ही गटाकडून कोणत्या चिन्हांची निवड करण्यात येणार याची उत्सुकता आता शिंगेला पोहोचली आहे.

हे ही वाचा:

संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही; ठाकरे गटाला मनसेने लगावला टोला

Shiv Sena Symbol: सर्वात मोठी बातमी! शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं, शिवसेना पक्षाचे नावही वापरता येणार नाही

आयोगाच्या निर्णयानंतर सुषमा अंधारेंचे सूचक ट्विट म्हणाल्या, फडणवीसजी तुम्ही जिंकलात…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss