शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांनी पक्षचिन्हाबाबत सूचक ट्विट

निवडणूक आयोगाकडून शनिवारी दि ८ ऑक्टोबर रोजी शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे. आता निवडणूक आयोगाचा पुढील निर्णय येईपर्यंत शिंदे गट आणि ठाकरे गटाला धनुष्यबाण या चिन्हाचा वापर करता येणार नाही.

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांनी पक्षचिन्हाबाबत सूचक ट्विट

निवडणूक आयोगाकडून शनिवारी दि ८ ऑक्टोबर रोजी शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे. आता निवडणूक आयोगाचा पुढील निर्णय येईपर्यंत शिंदे गट आणि ठाकरे गटाला धनुष्यबाण या चिन्हाचा वापर करता येणार नाही. सोबतच शिवसेना हे नाव देखील वापरता येणार नाहीये. हा उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर आता ठाकरे गट कोणतं चिन्ह निवडणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकरांकडून नव्या चिन्हाबाबत सूचक ट्विट करण्यात आले आहे.

मिलिंद नार्वेकर यांनी नव्या चिन्हाबाबत सूचक ट्विट केले आहे. मिलिंद नार्वेकर यांनी वाघाचा फोटो ट्विट केला आहे. वाघाचा फोटो ट्विट करून त्या फोटोमध्ये आमचे चिन्ह श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे असा मजकूर आहे. नार्वेकरांच्या ट्विटनंतर शिवसेना वाघाचे चिन्ह मागणार का? या चर्चेला उधाण आलं आहे.

हे ही वाचा:

संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही; ठाकरे गटाला मनसेने लगावला टोला

Shiv Sena Symbol: सर्वात मोठी बातमी! शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं, शिवसेना पक्षाचे नावही वापरता येणार नाही

आयोगाच्या निर्णयानंतर सुषमा अंधारेंचे सूचक ट्विट म्हणाल्या, फडणवीसजी तुम्ही जिंकलात…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version