Abdul Sattar : शिंदे गटात राडा, मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावर सत्तारांची शिवीगाळ केल्याचा दावा

Abdul Sattar : शिंदे गटात राडा, मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावर सत्तारांची शिवीगाळ केल्याचा दावा

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर पुढील रणनीति ठरवण्यासाठी शिंदे गटाने वर्षा बंगल्यावर महत्वपूर्ण बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीत अब्दुल सत्तारांनी मुख्यमंत्र्यांसमोर राडा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. वर्षा बंगल्यावरील बैठकीत अब्दुल सत्तारांनी मुख्यमंत्र्यांसमोर शिवीगाळ केल्याची माहिती समोर येत आहे.अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या खासगी सचिवाला शिविगाळ केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर सत्तार हे वर्षा बंगल्यावरील बैठकीतून निघून गेले. अशीही माहिती समोर येत आहे.

हेही वाचा :

घराचा प्रत्येक कोपरा सुगंधाने सुगंधित होईल, या टिप्ससह बनवा स्वतःचे एअर फ्रेशनर

नेमकं काय घडलं?

वर्षा बंगल्यावर आयोजित बैठकीत शिंदे गटाचे नेते आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवीगाळ केल्याचं सांगण्यात आलं आहे. त्याच्या या वागणुकीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याचं सांगण्यात आलं आहे.अब्दुल सत्तार यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव खतगावकर यांना शिवीगाळ केली. आपलं काम पूर्ण न झाल्याने सत्तार यांनी खतगावकरांना खडे बोल सुनावले. त्यानंतर आमदार आणि खासदारांनी त्यांची समजून काढण्याचा प्रयत्न केला.

Diwali 2022: या दिवाळीत बनवा खमंग भाजलेल्या पोह्यांचा चिवडा

त्यातच आता सत्तार यांच्या अशा वागणुकीच्या प्रकरणामुळे शिंदे गटाची आणि सरकारच्या प्रतिमेला तडा जात जाईल का अशी शंका निर्माण होत आहे. याआधीदेखील भाजप नेत्यांनी शिंदे गटातील आमदारांच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली होती. त्याचबरोबर या संपूर्ण वादानंतरअब्दुल सत्तार बैठकीला न थांबता निघून गेले. एकूणच या घटनेमुळे सत्तार यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव नाराज झाल्याचं एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

मुख्यमंत्र्यांविषयीचं वक्तव्य भोवलं; खैरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Exit mobile version