spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मंत्री एकनाथ शिंदे यांचे महत्वपूर्ण ट्विट

आघाडीचं सरकार आता धोक्यात येणार का ? अशा चर्चां राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. मंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरून एक ट्विट केले आहे.

भाजपने राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभूत केले. त्यामूळे राज्यातील राजकारणाचे चित्र बदलणार असल्याची शक्यता अनेकांकडून वर्तवली जात आहे. त्यातच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे अचानक नॉट रीचेबल असल्याची माहिती समोर आली. त्यामूळे राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार आता धोक्यात येणार का ? अशा चर्चां राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. मंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरून एक ट्विट केले आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे गुजरातमधील सूरतमध्ये असून त्यांच्यासोबत १२ पेक्षा अधिक आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे. एकनाथ शिंदे संपर्काबाहेर असल्याने त्यांनी बंड पुकारल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. अद्याप यावर ठोस वक्तव्यं  सामोर आलेलं नाही. त्यामुळे पुढे काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. काही वेळा पूर्वी मंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरून एक ट्विट केले आहे. जे सध्या प्रचंड चर्चेत आहे.
मंत्री एकनाथ शिंदे आपल्या ट्विट मध्ये म्हणतात, “आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही.” असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्रच्या राजकारणात पुढे काय काय घडामोडी घडतात हे पहावं लागेल.

Latest Posts

Don't Miss