Narayan Rane : उद्धव ठाकरेंनी पक्ष वाढीसाठी कधी प्रयत्न केला ? राणेंचा सवाल

Narayan Rane : उद्धव ठाकरेंनी पक्ष वाढीसाठी कधी प्रयत्न केला ? राणेंचा सवाल

नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

दसरा मेळाव्यापूर्वी काल (२१ सप्टेंबर) रोजी शिवासेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना गटनेत्यांचा मेळावा घेतला. मेळाव्या दरम्यान, ठाकरे यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. याप्रसंगी उद्धव ठाकरेंनी शिंदे व फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली आहे. महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु आहे. अशातच जनतेला प्रश्न पडलाय तो म्हणजे, दसरा मेळावा कोणाचा होणार?, यावर उद्धव ठाकरे यांनी गटनेत्यांसह जनतेला संबोधले. आरोप-प्रत्यारोपचा खेळ सुरू असताना. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता डाव टाकला आहे. दिल्ली येथून राणेंनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आता पर्यंत पक्षवाढीसाठी उद्धव ठाकरेंनी कधी प्रयत्न केले असा खोचक प्रश्न विचारला आहे. ‘हे आयत्या बिळावरचे नागोबा आहेत, सत्तेला दूध पाजता मग तूप कोणी खाल्ले.’ असे राणें यांनी म्हटले.

यापूर्वी मंत्री, आमदार, खासदारांच्या बैठका घ्यायचे. आता ते गटनेत्यांची बैठक घेत आहेत. असं राणे म्हणालेत. केंद्र सरकार आणि अमित शाह यांच्याबद्दल ते बोलले, निराशेच्या भावनेतून बोलले. त्यांचं भाषण त्याच भावनेतून होतं, असंही राणे म्हणालेत.

 

हेही वाचा : 

National Cinema Day : अवघ्या ७५ रूपयांत चित्रपटाचे तिकीट; असं बुक करा तिकीट

Exit mobile version