बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करण्यासाठी शिंदे गटातील मंत्री शिवाजी पार्कात

बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करण्यासाठी शिंदे गटातील मंत्री शिवाजी पार्कात

मुंबई : महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर तब्बल 39 दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. शिंदे गटातील 9 आमदार व भाजपातील 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज शिंदे गटातील मंत्रिपदासाठी नियुक्त मंत्री आज शिवसेनाप्रमुख (shivsena) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb thackeray) यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळाला भेट देऊन अभिवादन केल. मंत्रिपदाची शपथ घेतल्या नंतर शिंदे गटातील सर्व नऊ मंत्री एकत्रितपणे बाळासाहेब ठाकरे यांच्या दादरच्या शिवाजी पार्क (Shivaji Park)इथल्या स्मृतिस्थळी येऊन आज सकाळी दर्शन घेतले. याप्रसंगी शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

गुरुपौर्णिमा निमित्त मुख्यमंत्र्यांनी केले बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या नंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट देत त्यांनी अभिवादन केले. विरोधकांचे विरोध पत्करून बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादामुळेच माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता, शिवसैनिक या राज्याचा मुख्यमंत्री झाला, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली होती. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न मी आणि माझ्यासोबतचे 50 आमदार करत आहोत. बाळासाहेबांनी नेहमीच सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. मराठी माणसांना आणि हिंदूंना ताठ मानेनं जगण्याची शिकवण बाळासाहेबांनी दिली. म्हणून त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही काम करतोय.” अशी भावना या प्रसंगी मुख्यमंत्री एक्नास्थ शिंदे यांनी व्यक्त केली होती.

मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी आपली प्रतिक्रिया मांडली म्हणाले,”बाळासाहेबांची शिकवण आहे त्याप्रमाणे 80 टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण याचा आम्ही अवलंब करु,” असे त्यांनी म्हटले.

“शिवसेनाप्रमुख आमच्या ह्रदयात आहे. शपथ घेताना लिहून दिले आहे त्याप्रमाणेच वाचावं अशी सूचना असल्याने बाळासाहेबांचं नाव घेतलं नव्हतं. पण ते आमच्या मनात, ह्रदयात कायम आहेत,” असं शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी यावेळी म्हटले.

हेही वाचा : 

बाळासाहेब थोरातांनी जीएसटीवरून मोदींना लगावला टोला

Exit mobile version