मीरा -भाईंदर बस ड्रायव्हरला भररस्त्यात तुडवले , त्याचा विधान सभेत पाडसाद

गेल्या काही दिवसात मीरा भाईंदर येथे बस सेवा अतिशय खराब झाली आहे. इथे बस ठेकेदाराने प्रशाकीय अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन बस ड्रायव्हरला अमानुष मारहाण केली आहे ,

मीरा -भाईंदर बस ड्रायव्हरला भररस्त्यात तुडवले , त्याचा विधान सभेत पाडसाद

गेल्या काही दिवसात मीरा भाईंदर येथे बस सेवा अतिशय खराब झाली आहे. इथे बस ठेकेदाराने प्रशाकीय अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन बस ड्रायव्हरला अमानुष मारहाण केली आहे , त्याचा परिणाम नागरिकांच्या जीवनावर झाला आहे. त्याचे पडसाद आता विधान सभेत पडताना दिसत आहे. या बद्दल टाइम महाराष्ट्रने शिवसेनेचे मीरा भाईंदर चे आमदार प्रतापराव सरनाईक ह्यांची मुलाखत घेतली. तेव्हा ह्या प्रकरण बद्दल बोलताना सरनाईक म्हणाले कि गेल्या तीन वर्षापासुंमीरा भाईंदर महानगरपालिकेच्या बसेस चालण्या साठी महालक्ष्मी म्हणून ठेकेदार आहे. राजकीय काम असला तरी ह्या ठेकेदाराच्या विरोधात गेल्या तीन वर्षात अनेक गुन्हे दाखल झाले आहे,कालत्र त्याने भीषण कृत्य केले ,प्रवास्यांनी भरलेल्या बस च्या ड्रायव्हरला उतरवून त्याने मारहाण केली. बस मधल्याच एका प्रवाशाने हि घटना शूट केली आणि वायरल केली तेव्हा हि घटना सर्वाना माहित झाली. त्यामुळे परिवहन च्या कामगारांनी २ दिवस संप पळाला

 

एक ठेकेदार जो परिवहन क्षेत्रातला आहे तो जर असा बघत असेल तर त्याचा परवाना रद्द करावा आणि लवकरात लवकर नवीन ठेकेदार नियुक्त करावा अशी सर्व कामगारांची मागणी आहे. एखाद्या ठेकेदाराने असे कृत्य केल्यानंतर त्याला जोवर सरकार काळ्या यादीत टाकत नाही तो वर असे अमानुष कृत्य थांबणार आहे. आणि कोणत्याही एका आधीकार्यावर आपण बोट ठेऊ शकत नाही पण हेही तितकच खर कि सरकारच्या पाठिंब्याशिवाय हे अशक्य नाही. हा ठेकेदार नक्की एखाद्या राजकीय पक्षाशी संबंधीत असणार आहे. परंतु ह्या गोष्टी गमनभीर आहे ह्यावर चर्चा झाली पाहिजे राज्याच्या नगरविकास खात्याकडून ह्याची चौकशी केली जाईल याची खात्री असल्याचं देखील ते ह्या वेळेस म्हणाले. पालिका प्रशासन सुद्धा कठोर भूमिका घेत आहे कारण हा संप आणि त्यामुळे होणारे नागरिकांचे नुकसान सरकारला जाणवत आहे त्यामुळे ह्यावर लवकरच पाऊल उचलणार असल्याचं प्रतापराव सरनाईक ह्यांनी सांगितलं.

उन्मत्त ठेकेदार आणि त्यांना प्रशासनाची असलेली साथ यामुळे लोकांचे आतोनात नुकसान होता आहे. हे सर्व कधी थांबेल ह्याचीच नागरिक वाट पाहत आहे.

Exit mobile version