Monday, September 30, 2024

Latest Posts

आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, हायकोर्टानं दिलासा नाकारला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील (Bhosari MIDC Land Scam) कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणातील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील (Bhosari MIDC Land Scam) कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणातील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करण्याची याचिका त्यांनी हाय कोर्टामध्ये दाखल केली होती. पण हाय कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. या प्रकरणी हायकोर्टाने खडसेंना कठोर कारवाईपासून आजपर्यंत दिलासा दिला होता. मात्र आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणामध्ये एकनाथ खडसे , त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे, जावई गिरीश चौधरी आणि इतर काही आरोपी यामध्ये सामील आहेत.

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी ८ एप्रिल २०२६ रोजी भोसरी येथील एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून ३. ७५ कोटी रुपयांना खरेदी केली होती. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली होती. एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या आणि त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. या जमीन व्यवहाराखाली गिरीश यांनी पाच शेल कंपन्यांकडून आलेला पैसा वापरला आहे. या सर्व व्यवहारात राज्य सरकारचे ६१ कोटी रुपये नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर गिरीश चौधरी याना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावून त्यांना अटक केली होती. एकनाथ खडसे यांचीही याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती.

हे ही वाचा: 

नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक; डोंबिवलीतील रॅकेट उद्ध्वस्त

रविवारी कांगारू पस्तावले, विजयी Team India तून शुभमनसाठी कोणाला वगळणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss