‘मी काँग्रेस सोडणार’ माजी मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

‘मी काँग्रेस सोडणार’ माजी मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

गेल्या दिवसांपासून माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे निष्ठावंत आमदार पृथ्वीराज चव्हाण नाराज असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस पक्षातील नाराजीबद्दल त्यांनी कित्येकवेळा जाहीरपणे नाराज असलयाचे व्यक्त देखील केलं. ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार का? याबाबत जोरदार चर्चांणा उधाण आले आहे.आज पृथ्वीराज चव्हाण यांची कराडमध्ये पत्रकार परिषद झाली.

मी काँग्रेस सोडणार असल्याच्या बातम्या कुणी पेरल्या आहेत हे मला माहित नाही. पण मी काँग्रेसच्या विचाराचा आहे. आम्हाला भिती आहे की लोकशाही धोक्यात आहे, असं ते म्हणाले आहेत. काँग्रेस पक्षात पूर्णवेळ अध्यक्ष असावा, अशी मागणी ऑगस्ट २०२० मध्ये आम्ही केली होती. ती मागणी सोनिया गांधींनी मान्य केली.

हेही वाचा : 

भारताची पहिली मानवी अंतराळ उड्डाण मोहीम ‘गगनयान’ २०२४ मध्ये प्रक्षेपित होणार

महाराष्ट्राची बिकट अवस्था

चव्हाण पुढं म्हणाले, ‘काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक १७ ऑक्टोबरला होत आहे. कोरोनामुळं अध्यक्षांचा थेट संवाद होत नव्हता. त्यांच्या भेटीसाठी वेळ मिळाली नाही. यामुळं अध्यक्षांना पत्र लिहिलं होतं. ते गोपनीय होतं. ते पत्र फोडलं. काँग्रेसचा अध्यक्ष थेट नेमणुकीमुळं होऊ नये. त्यासाठी निवडणूक व्हावी, अशी आमची मागणी होती. ती आता मान्य झाली आहे.’ गोव्यातील काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या मुद्यावर बोलताना चव्हाणांनी गोव्यात दुर्दैवी घडलं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

फॉक्सकॉन-वेदांत प्रकल्प म्हणजे काय?, सेमीकंडक्टर प्लाँटची उभारणी, राज्याचे किती नुकसान झालं, जाणून घ्या सविस्तर माहिती

मागील २४ वर्षात काँग्रेस अध्यक्ष पदाचे संघटनात्मक पदांच्या निवडणुका झालेले नाहीत. पक्षात होय बा’ संस्कृती वाढत आहे. प्रत्येक निवडणुकीत पक्षाचा पराभव होत असूनही त्यावर चिंतन होत नाही. सात आमदारांनी पक्षविरोधी भूमिका घेत विधानपरिषद निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले होते. पक्षाशी गद्दारी करणार्‍या आमदारांवर कारवाई होत नाही, अशी खंत व्यक्त करत नामोल्लेख टाळत गांधी घराण्यासह काँग्रेस पक्षातील कार्यपद्धतीवर चव्हाणांनी टीका केली.

तरूण तरूणींनी सरकार विरोधात पेटून उठले पाहिजे – अजित पवार

Exit mobile version