शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी भाजपच्या टार्गेटवर, आ.रोहित पवारांचा गंभीर आरोप

शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी भाजपच्या टार्गेटवर, आ.रोहित पवारांचा गंभीर आरोप

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेना फुटली त्यानंतर ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले. शिवसेनेला लागलेल्या या गळतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस सतर्क झाल्याचे संकेत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार आम्हाला येऊन भेटतात, असं वक्तव्य शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी नुकतचं केलं आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी यासर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सनसनाटी वक्तव्य केलं आहे. राजकारणातील घराणेशाही, भाजपच्या हिंदुत्वाचे आव्हानासह शरद पवारांशी असलेल्या नात्याबाबत कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी माहिती दिली.

Bhediya Poster : ‘भेडिया’ सिनेमाचं नवं पोस्टर आऊट; कृती सेनॉनच्या लुकने प्रेक्षक थक्क!

रोहित पवार यांना त्यांच्या अजित पवार यांच्यासोबतच्या संबंधांबद्दल प्रश्न विचारण्यात आलं. तुम्हा दोघांमध्ये तणाव आहे का, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. याला उत्तर देताना पवार म्हणाले, “मला जिल्हा परिषद निवडणुकीत पहिलं तिकीट अजित पवार यांनी दिलं. मला आमदारकीचं तिकीटही त्यांनी दिलं. एवढंच काय माझं लग्नही अजित पवारांनीच जमवलं आहे. तुम्हाला जेव्हा प्रगती करायची असते, तेव्हा कुटुंबात तुम्ही स्पर्धा करू शकत नाही. आमचे ध्येय वेगळे आहे. ” असे रोहित पवार यांनी म्हटले.

हेही वाचा : 

राज्य सरकार शंभर रुपयांत तेल, रवा, डाळी देणार? या योजनेचं नेमकं झालं काय? – अजित पवार संतापले

पुढे ते म्हणाले “आमची सर्वांचं उद्दिष्ट् स्पष्ट आहेत. सुप्रिया सुळेंना लोकसभेत, अजित पवारांना राज्यात आणि मला सध्या जे करत आहे तेच काम करण्याची इच्छा आहे. पण विरोधकांना ज्याप्रकारे शिवसेनेत दोन गट पाडले, त्याप्रमाणे आमच्या कुटुंबात फूट पाडायची आहे. पवार कुटुंबात अंतर्गत भांडण असेल तर राष्ट्रवादी फुटेल असं विरोधकांना वाटत आहे. शिवसेनेनंतर आम्ही पुढील टार्गेट असू शकतो”

अजित पवारांची प्रतिक्रिया

रोहित पवार यांच्या दाव्यावर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की “रोहितला या विधानामागचा अर्थ नेमका काय आहे ते विचारतो. भाजपा, काँग्रेस, मनसे, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना या प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काम करावं”. अजित पवार यांनी आपले मत मांडले.

मेट्रो ३च्या विरोधात प्रकल्पग्रस्त गिरगाव-काळबादेवी येथील रहिवाशांचे राज्य सरकार विरोधात आंदोलन

Exit mobile version