spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sanjay shirsat : आमदार संजय शिरसाट परतीच्या वाटेवर ?

महाराष्ट्राच्या राजकारणातली आता एक सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) जय महाराष्ट्र केला आणि एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गटाचा झेंडा खांद्यावर घेतला.

मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणातली आता एक सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) जय महाराष्ट्र केला आणि एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गटाचा झेंडा खांद्यावर घेतला. मात्र सुरुवातीपासून शिंदे गटात सामील होऊनही संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळालं नाही. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Shivsena MLA Sanjay Shirsat) हे आता उद्धव ठाकरेंकडे परतीच्या वाटेवरती आहेत का? असा सवाल सध्या उभा राहिला आहे. याच्या मागचे मुख्य कारण म्हणजे आमदार संजय शिरसाट यांनी केले ट्विट आहे. शिवसेना आमदार बंड करुन गुवाहाटीला गेल्यानंतर संजय शिरसाट यांनी पत्र लिहून टीकास्त्र सोडलं होतं. संजय शिरसाट हे मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज आहेत. शिरसाटांच्या ट्विटमुळं संभ्रमावस्था वाढलीय, त्यामुळं शिरसाट उद्धव ठाकरेंच्या गटात जाणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे.

नेमके काय होते ट्विट ?
काल रात्री संजय शिरसाट यांनी एक ट्वीट (Sanjay Shirsat Tweet) केले. ज्यात ‘उद्धव ठाकरे’ यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख केला होता. टि्वट सोबतचं विधानसभेतलं उद्धव ठाकरे यांचे एक भाषण देखील त्यांनी जोडलं होतं. मात्र काही वेळातचं त्यांनी हे ट्वीट डिलीट देखील केलं. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचं भाषण ट्वीट करत शिंदे गटाला इशारा तर दिला नाही ना अशी आता चर्चा सुरु झाली आहे. या ट्विटने राज्याचं राजकारण पुन्हा हादरवून सोडलेलं आहे.

आमदार संजय शिरसाट यांचे डिलीट केलेले ट्विट

ट्वीट डिलिट केल्यानंतर शिरसाट यांनी म्हटलं की, आम्ही ज्यावेळी शिवसेनेत काम करत होतो. आम्ही आजही शिवसेनेत काम करतो. उद्धव ठाकरे आमचे कुटुंबप्रमुख होते. एकनाथ शिंदे आता आमचे कुटुंबप्रमुख आहेत. उद्धव ठाकरेंशी मतभेद असले तरी त्यांच्या विरोधात बोलू शकत नाही, अशी भूमिका पहिल्या दिवसापासून घेतली आहे. उद्धव ठाकरे काही काळ आमचे कुटुंबप्रमुख होते. उद्धव ठाकरेंनी घेतलेली भूमिका आम्हाला मान्य नव्हती, आमचा त्याला विरोध होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी नको, असं आमची भूमिका आहे. भूमिका पटत नाही मात्र नातं तोडलेलं नाही, आम्ही दूर गेलो नाही, आम्ही आमच्या भूमिकेवर तटस्थ राहिलो ते त्यांच्या भूमिकेवर तटस्थ आहे, असं संजय शिरसाट म्हणाले.

मी मंत्रिपदासाठी दबाव आणत नाही. एखाद्यावर विश्वास ठेवला किंवा एखाद्याला आपलं मानलं तर त्याच्यासाठी मान कापली गेली तर हरकत नाही. एकनाथ शिंदे जे भूमिका घेतील ती भूमिका मान्य असेल, असं संजय शिरसाट म्हणाले. मातोश्रीवर पुन्हा जाणार नाही, असं संजय शिरसाट म्हणाले. उद्धव ठाकरेंनी भूमिका बदलावी, भूमिका बदलणं तुमच्या हातात नसेल. शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतलीय त्यामुळं ४० आमदार बाहेर पडले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर राहिलो तर ती आमची आत्महत्या ठरली असती. आम्ही शिवसेना म्हणून बाहेर पडलो, असून आम्ही शिवसेना काम करतोय, असे देखील संजय शिरसाट म्हणाले.

हे ही वाचा :-

‘म्हणून’ गृहमंत्री अमित शहांनी कापला शेलारांचा पत्ता

Latest Posts

Don't Miss