Sanjay Shirsat : आमदार संजय शिरसाट सुखरूप घरी परतले, डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला

Sanjay Shirsat : आमदार संजय शिरसाट सुखरूप घरी परतले, डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला

बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार संजय शिरसाट यांना लिलावती रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला आहे. संजय शिरसाट यांना एक आठवडा घरी आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यामुळे उपचारांसाठी त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लिलावती रुग्णालयातील डॉक्टर गोखले आणि राव यांच्या टीमने आमदार संजय शिरसाट यांच्यावर अँजिओप्लास्टी केली. शिरसाट चार दिवस लिलावती रुग्णालयात दाखल होते. अखेर आज त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. डॉक्टरांकडून संजय शिरसाट यांना विश्रांती घेण्याचा आणि जास्त ताण न घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हेही वाचा : 

Kantara : ‘कांतारा’ चित्रपटपाहून कंगना झाली इम्प्रेस; केला व्हिडिओ शेअर

आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा, शिरसाट यांना एअर अ‍ॅम्ब्युलन्सनं शिरसाट यांना लीलावतीमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अ‍ॅम्ब्युलन्समधून उतरून चालत संजय शिरसाट रुग्णालयात गेलेले पाहायला मिळाले. औरंगाबादहून एअर अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे शिरसाटांना मुंबईला रवाना करण्यात आलं. दोन दिवसांपासून शिरसाटांची तब्येत बिघडल्याचं सांगण्यात आलं. १६ तारखेला (सोमवारी) दुपारी जास्त त्रास जाणवू लागल्याने त्यांना औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज सकाळीच त्यांना तातडीने एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला रवाना करण्यात आलं. संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने संजय शिरसाट यांनी जाहीरपणे नाराजी देखील व्यक्त केली होती.

Sanjay Raut : खा.संजय राऊतांच्या यंदा दिवाळी फराळ कोठडीतच, अजूनही दिलासा नाहीच

शिरसाट यांची राजकीय वाटचाल

राज्यात झालेल्या सत्तांतरात शिरसाट देखील सामील होते. शिवसेनेचे उमेदवार म्हणून सलग तीन वेळेस विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत संजय शिरसाट यांनी भाजपचे बंडखोर उमेदवार राजू शिंदे यांचा ४० हजार ७४७ मतांनी पराभव केला होता.

संजय शिरसाट यांची १९८५ मध्ये शिवसेनेचे शहर संघटक म्हणून नियुक्ती झाली होती. राज्यात १९९५ मध्ये युतीची सत्ता आल्यानंतर मराठवाडा औद्योगिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी त्यांची निवड करण्यात आली होती. शिरसाट हे २००० मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २००९ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाले. त्यानंतर सलग तीन वेळेस शिरसाट यांनी विजय संपादन केला.

कृष्णा-अर्जुन जिहादच्या वक्तव्यावर शिवराज पाटील यांचे स्पष्टीकरण, म्हणतात- ‘मी फक्त हे विचारले’

Exit mobile version