spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आमदार संतोष बांगर यांच्याकडून प्राचार्याला मारहाण, कारण अद्याप स्पष्ट नाही

कळमनुरीचे शिंदे गटातील आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे कायम त्यांच्या कोणत्या-कोणत्या वादामुळे चर्चेत असतात. साध्य संतोष बांगर (Santosh Bangar) हे सरकारी कर्मचारी यांना शिवीगाळ केल्यामुळे किंवा शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यामुळे चर्चेत आले आहेत. आता पुन्हा एकदा आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी शहरालगत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्यांना (Principal) शिवीगाळ करत मारहाण केली आहे. आमदार संतोष बांगरच (Santosh Bangar) नाही तर बांगर यांचे कार्यकर्ते सुद्धा प्राचार्यांचे कान पकडत मारहाण केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह संबंधित प्राचार्याच्या (Principal) कार्यालयात गेले आणि त्यांना शिवीगाळ केली आणि त्यानंतर प्राचार्यांना (Principal) आमदारांनी मारहाण देखील केली आहे. पण मुख्य म्हणजे आमदारच नाही तर त्याच्या कार्यकर्त्यांनी देखील प्राचार्यांचे कान पकडून त्यांना मारहाण केली आहे. आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी प्राचार्यांना मारहाण का केली याचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही आहे. पण अशा प्रकारे कायदा हातात घेऊन कायद्याचे उल्लंघन करणे हे अतिशय चुकीचे आहे. या विषयावर आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या प्रकरणाचे स्पष्टीकरण देखील दिलेले नाही आहे. त्याच बरोबर आमदार संतोष बांगर यांच्या विषयीचे अनेक प्रकरण समोर आले आहे. दर वर्षाच्या सुरुवातीला हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील वारंगा मसाई इथल्या मसाई मातेची यात्रा निघते. या यात्रेत कोणत्याही राजकीय व्यक्तींना प्रवेश दिला जात नाही. वर्षानु वर्षे चालत अशी आलेली प्रथा आहे. पण आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी या वर्षाच्या सुरुवातीला काढण्यात आलेल्या मसाई मातेच्या यात्रेत सहभाग घेतला होता. त्यामुळे प्रचंड वाद निर्माता झाला होता.

काही महिन्यांपूर्वी आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला देखील शिवीगाळ केली होती. एकदा आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) त्यांच्या कार्यकर्त्यां सोबतर मंत्रालयात जात होते.यावेळेस तेथे तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने पासबाबत विचारपूस केल्याने आमदार बांगर यांनी त्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली होती. या सम्पूर्ण प्रकरणाची नोंद संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस डायरीमध्ये करून ठेवल्याची माहिती आहे.

हे ही वाचा:

पिंपरी चिंचवड आणि कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी उतरणार की नाही? संजय राऊत म्हणले,…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss