spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आमदार संतोष बांगर यांच्या ताफा शिवसैनिकांनी अडवला, ‘माझ्यावर हल्ला करणाऱ्यांचे तुकडे करणार’

शिवसेनेतून बंडखोरी करून शिंदे गटात गेलेले आमदार संतोष बांगर हे काल अंजनगांव सुर्जी येथील देवनाथ मठातून दर्शन घेऊन निघाले असता शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर हल्लाबोल केला. यावेळी शिवसैनिकांनी पन्नास खोके एकदम ओकेचे नारे देण्यात आले. संतोष बांगर यांच्या वाहनांचा ताफा अंजनगांव सुर्जी येथे येताच कार्यकर्ते वाहतांना आडवे गेले. यावेळी आमदार ज्या बाजूला गाडीत बसले होते त्या गाडीचा दरवाजा देखील उघडला. परंतु, सुरक्षा रक्षकाने धाव घेत दरवाजा बंद केला. यावेळी शिवसैनिक खूपच आक्रमक झाले होते. परंतु, बांगर यांनी आपली गाडी न थांबवता तेथून निघून गेले.

हेही वाचा : 

Game of thrones : ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, सातव्या एपिसोडचा ट्रेलर प्रदर्शित

या घटनेनंतर आमदार संतोष बांगर यांनी संतप्त होऊन प्रतिक्रिया दिली, ‘याला हल्ला म्हणता येणार नाही. हल्ला कशाला म्हणतात. समोरून येवून सामना करतात त्याला हल्ला म्हणतात. हे ठरवून केलेले कृत्य आहे’, असं बांगर म्हणाले. ‘माझी बहीण आणि माझी पत्नी जर त्या कारमध्ये नसते एक घाव दोन तुकडे केले असते’, असं खुलं आव्हानही संतोष बांगर यांनी यावेळी दिलं.

Game of thrones : ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, सातव्या एपिसोडचा ट्रेलर प्रदर्शित

या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या सोबत फोन वरून संवाद साधला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशा नंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे आमदार बांगर यांनी सांगितले आहे. दरम्यान, तान्हाजी सावंत यांच्यानंतर आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केल्यानंतर पुन्हा एकदा शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा संघर्ष होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत पोलिसांनी १० आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Stock Market : गुंतवणूकदारांना मोठा धक्का, सेन्सेक्समध्ये ५०० अंकांची घसरण

Latest Posts

Don't Miss