spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Maharashtra Winter Session 2022 आपल्या अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन आमदार सरोज अहिरे पोहचल्या विधानभवनात

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या (Nashik) देवळाली मतदारसंघाच्या (Deolali Assembly) राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे-वाघ या अडीच महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन विधान भवनात पोहोचल्या.

Maharashtra Winter Session 2022 : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या (Nashik) देवळाली मतदारसंघाच्या (Deolali Assembly) राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे-वाघ या अडीच महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन विधान भवनात पोहोचल्या. आणि चर्चेचा विषय ठरल्या आहेत मी आई आहेच सोबत आमदारही आहे, त्यामुळे दोन्ही कर्तव्ये महत्वाची आहेत. बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही सोबत मतदारसंघातील लोकांचे प्रश्नही महत्वाचे आहेत, त्यामुळे बाळाला घेऊन यावे लागले अशी भावना अहिरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

विधिमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या आमदार सरोज अहिरे-वाघ या अडीच महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन विधान भवनात पोहोचल्या. मी आई आहेच सोबत आमदारही आहे, त्यामुळे दोन्ही कर्तव्ये महत्वाची आहेत. बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही, सोबत मतदारसंघातील लोकांचे प्रश्नही महत्वाचे आहेत, त्यामुळे बाळाला घेऊन यावे लागले अशी भावना अहिरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

देशासह जगभरात अनेक महिला आहेत, ज्या दोन्ही गोष्टी सांभाळून आपले कर्तव्य निभावत आहेत. प्रशंसक हा केवळ अडीच महिन्यांचा असून माझ्याशिवाय तो राहू शकत नाही. म्हणून त्याला इथे घेऊन आलेलो आहे, जेवढे शक्य असेल तेवढे अधिवेशन अटेंड करून मतदारसंघासाठी न्याय मागण्यासाठी इथे आलेली आहे. स्वतःला नशीबवान समजेल आणि माझ्या बाळाला पण ती इतक्या पवित्र इमारतीमध्ये त्याचं पहिलं पाऊल म्हणजे घरातून त्याला पहिल्यांदाच बाहेर काढले आहे. त्यानंतर तो थेट नागपूर समृद्धी महामार्गाने नागपूरला आलेला आहे. आज विधानभवन सारख्या ठिकाणी त्याचबरोबर नागपूर सारख्या पवित्र भूमीमध्ये त्याचं पहिलं पाऊल आहे. लोकप्रतिनिधी म्हणून जे कर्तव्य आहे, तो बजावणं आवश्यक आहे. ते कर्तव्य बजावण्यासाठी आली असून आई म्हणून जे कर्तव्य आहे, ते देखील पूर्ण करायचा असल्याचे मत आमदार सरोज अहिरे यांनी व्यक्त केले आहे.

प्रशंसक प्रवीण वाघ असे बाळाचे नाव आहे. ३० सप्टेंबरला त्याचा जन्म झाला. त्यानंतर प्रथमच अधिवेशन असल्याने त्या बाळ व पती प्रवीण वाघ आणि अन्य कुटुंबीयांसह विधानभवनात पोहोचल्या. कुटुंबीय बाळाला सांभाळतील त्याचवेळी मी सभागृहात मतदारसंघातील प्रश्न मांडणार आहे. अधिवेशन किती दिवस चालेल माहिती नाही, लोकांचे अधिकाधीक सोडवण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अडीच महिन्याचा प्रशंसक विधानभवनातील राजकीय गोंधळापासून अलिप्त राहून आईच्या कुशीत निवांत झोपला होत.

हे ही वाचा : 

Maharashtra Winter Session 2022 ‘बोम्मईंच्या नावानं खोटं ट्विट कुणी केलं हे कळलंय’, विधानसभेत शिंदेनी केला खळबळजनक दावा

Maharashtra Winter Session 2022 मिंधे सरकारविरोधात ‘मविआ’चे आमदार आक्रमक, पहिल्याच दिवशी विधानभवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी

Hemant Godse एक मच्छर आदमी को… राऊतांच्या टीकेला हेमंत गोडसेंनी दिलं प्रत्युत्तर

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss