spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Maharashtra Winter Session 2022 मिंधे सरकारविरोधात ‘मविआ’चे आमदार आक्रमक, पहिल्याच दिवशी विधानभवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू होत आहे. करोना काळानंतर आणि राज्यातील सत्तांतरानंतर नागपूरमध्ये होणारं हे पहिलेच अधिवेशन आहे.

Maharashtra Winter Session 2022 : विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू होत आहे. करोना काळानंतर आणि राज्यातील सत्तांतरानंतर नागपूरमध्ये होणारं हे पहिलेच अधिवेशन आहे. हे अधिवेशन ३० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली मिंधे सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, विदर्भाला न्याय मिळालाच पाहिजे, महाराष्ट्र द्रोहाला संरक्षण देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देऊन विधानभवन परिसर दणाणून सोडला.

कर्नाटक सरकार हाय हाय.. बोम्मई सरकार हाय हाय… शिंदे सरकार हाय हाय… गद्दाराचे पाप महाराष्ट्राला ताप… खोके सरकार, खोटे सरकार… ५० खोके एकदम ओके… खोके सरकार काय म्हणतंय,गुजरातला प्रकल्प न्या म्हणतंय… शेतकऱ्याला मदत नाय म्हणतंय…महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक…मिंधे सरकारचा निषेध करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत विधानभवन परिसर दणाणून सोडला.

या आंदोलनात विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, धनंजय मुंडे यांच्यासह विरोधी पक्षाचे, महाआघा़डीचे सर्व आमदार आंदोलनात सहभागी झाले. ५० खोके एकदम ओके असे बॅनर विरोधी पक्षाच्या आमदारांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कर्नाटक सरकार हाय हाय, ईडी सरकार हायहाय अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, आदिती तटकरे, अशोक चव्हाण राजेश टोपे, एकनाथ खडसे, अंबादास दानवे, नाना पटोले यांसह इतर आमदार उपस्थित होते.

दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच वाहतूक व्यस्थेतही अनेक बदल करण्यात आले आहे. विधानभवन परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयातून पासेस घ्याव्यात, वॉकर स्ट्रीटवर मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने पोलीस जिमखानाजवळील पुलाजवळून पुढे सीपी क्लब या मार्गावर उभी करावी, विधानभवन परिसरात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र सोबत बाळगावे, अशा सुचनादेखील पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा : 

हे सरकार घाबरट सरकार आहे, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी धमकी दिल्यावर दोन मंत्री घाबरून तिकडे गेलेच नाही, आदित्य ठाकरे

‘मोर्चा फेक गेला’ म्हणणाऱ्या भाजपाला सामाना’तून प्रत्युत्त

FIFA World Cup Final 2022 अर्जेंटिनावर पैशांचा पाऊस!, विश्वचषकात सहभागी होणाऱ्या संघांवरही FIFA कडून बक्षिसांची लूट

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss