spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MLC Election 2024 Result: विरोधकांची स्वप्न धुळीस मिळाली, Deepak Kesarkar यांचे वक्तव्य

शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena) नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिवसेना उबाठा (Shivsena UBT) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका करत, "संजय राऊतांकडे महाराष्ट्र करमणुकीच्या दृष्टीने पाहतो," असे म्हंटले आहे.

Maharashtra Vidhan Parishad Election Result 2024: महाराष्ट्रातील सध्याच्या घडीला सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल (MLC Election 2024 Result) आता समोर आला आहे. विधान परिषदेच्या काल (शुक्रवार, १२ जुलै) झालेल्या निवडणूकीत महायुतीने सर्वच्या सर्व ९ जागांवर विजय मिळवला. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान झालं. १२ उमेदवार रिंगणात असल्याने विधान परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. आता शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena) नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी यावर व्यक्त होत, “काल विरोधकांची स्वप्न धुळीस मिळाली आहे,” असे वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी शिवसेना उबाठा (Shivsena UBT) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका करत, “संजय राऊतांकडे महाराष्ट्र करमणुकीच्या दृष्टीने पाहतो,” असे म्हंटले आहे.

यावेळी दीपक केसरकर म्हणाले, “भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फुट पडेल अशी विरोधकांना अपेक्षा होती, ही त्यांची स्वप्नं धुळीला मिळाली आहेत. विरोधकांना वाटले होते की लोकसभा निवडणुकीनंतर अनेक लोकं ही शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीपासून लांब जातील. मात्र आमदारांना नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे त्यामुळे काल आमदारांमध्ये फुट पडली नाही. महायुतीचा हा विजय निश्चित आहे.”

शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत महायुतीवर टीका केली होती. आमदारांचा भाव शेअर मार्केटसारखा वाढत होता या त्यांच्या वक्तव्यावर दीपक केसरकर म्हणाले, “आरोप करणारे काहीही आरोप करत असतात. संजय राऊत त्या गोष्टींची शहानिशा न करता बोलतात. शहानिशा केली नाही तर नाहक बदनामी होते. संजय राऊत बेलगाम बोलत असतात. संजय राऊतांकडे महाराष्ट्र करमणुकीच्या दृष्टीने पाहतो,” असे ते म्हणाले.

भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांचा अधिवेशनादरम्यानचा एक व्हिडिओ काल व्हायरल होत होता. मेघना बोर्डीकर फाईलमध्ये पिसे ठेवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत होते. विरोधकांनी यावर सवाल उपस्थित केला होता. यावर दीपक केसरकर म्हणाले, “काही बोलायचे, काहीही करायचे… कोणाकडे १००० रुपये नसू शकतात का? हे चुकीचे आहे. यांना वाटले की लोकसभा प्रमाणे विधानसभेमध्ये पण विजय होईल पण तसे नाही. एका समाजाने एकतर्फी मतदान दिले. त्यामुळे आम्हाला फटका बसला आहे. पण असे होणार नाही विधान सभे आमचा विजय निश्चित आहे,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, CM Eknath Shinde यांनी स्वीकारला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : “Home guard जवानांना १८० दिवस काम देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करा” ; Satyajeet Tambe यांनी सभागृहात केली मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss