MLC Election 2024 VOTING : विधानपरिषद निवडणुकीसंदर्भांत Ashish Shelar यांचे मोठे वक्तव्य

MLC Election 2024 VOTING : विधानपरिषद निवडणुकीसंदर्भांत Ashish Shelar यांचे मोठे वक्तव्य

काल म्हणजेच १२ जुलै २०२४ रोजी विधानपरिषद निवडणूका पार पडल्या. यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा हा जंगी समान होता. या सामन्यात महायुतीला विजयाची माळ मिळाली आहे. यात एकूण ११ जागांसाठी १२ उमेदवार अशी लढत रंगली होती. त्यापैकी ११ आमदारांचा विजय झाला आहे. दरम्यानच्या काळात विजयी उमेदवारांचे अनेकांनी स्वागत व शुभेच्छा दिल्या आहे. तर काही जणांनी खळबळ जनक वक्तव्यसुद्धा केली आहेत. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी काल निवडणूक (Vidhanparishad Election) पार पडली. या १२ वा उमेदवार मैदानात उतरवल्यामुळे निवडणूक अटीतटीची झाली. त्यात दोन्ही पक्ष आमचाच विजय होणार असा दावा करत होते. महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) काही मते फुटणार असा दावाही सत्ताधाऱ्यांकडून केला जात होता. लोकसभेत महायुतीचा पराभव झाला मात्र, विधानपरिषदेत मात्र अखेर महायुतीच (Mahayuti) अव्वल ठरली आहे. नववा उमेदवार जिंकून आणत महायुतीने मविआला धक्का दिला आहे. शिवाय यात काँग्रेसची आठ मतं फुटल्याचंही बोललं जात आहे.

महाविकास आघाडीच्या (Mahavikaas Aghadi) दोन उमेदवारांचा विजय झाला तर शेकापचे जयंत पाटील (Jayant Patil) यांचा मात्र पराभव झाला. यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे. ठाकरे गटाने जयंत पाटील यांचा ठरवून पराभव केला. आपल्यासोबत असणाऱ्या छोट्या छोट्या पक्षांना उबाठा संपवण्याचं काम करतेय, अशी सणसणीत टीका शेलारांनी केली. तसेच ‘छोट्या पक्षांनो तुम्ही अजगराच्या विळख्यात सापडला आहात’, असा इशाराही शेलारांनी दिला. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून सुरुवातीला काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि शेकापचे जयंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. ११ जागांसाठीच्या निवडणुकीत पुरेशी मते नसतानाही शिवसेना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर (Milind Narveka) यांना उमेदवारी जाहीर केली होती. यावरून शेकापचे जयंत पाटील यांचा उबाठाने (UBT) ठरवून पराभव केल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

आशिष शेलार यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत म्हटले आहे की, विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे (BJP) पाचही उमेदवार विजयी! सर्व विजेत्या उमेदवारांचे अभिनंदन!! महाराष्ट्र पाहतोय… लोकसभा निवडणुकीत उबाठाने स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींना मदत केली नाही.  मुंबई शिक्षक मतदारसंघात महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिक्षक भारतीचे नेते कपिल पाटील यांच्या उमेदवाराचा उबाठाने पराभव केला. गम्मत म्हणजे कपिल पाटलांच्या समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापनाच उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली होती. तर आता विधान परिषद निवडणुकीत ही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेकापचे उमेदवार शेतकरी नेते जयंत पाटील यांचा उबाठाने ठरवून पराभव केला. सोबत असलेल्या छोट्या पक्षांना संपवण्याचे काम कोण करतोय…? महाराष्ट्र पाहतोय. छोट्या पक्षांनो तुम्ही अजगराच्या विळख्यात सापडला आहात, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

हे ही वाचा:

MLC ELECTION 2024 VOTING : MAHAYUTI ची आघाडी ; मात्र MAHAVIKAS AGHADI मध्ये ८ मतांची बिघाडी

बेरोजगार आहात.. तर तुमच्यासाठी नवी संधी चालून आली आहे ; NFL मध्ये आली नवी भरती त्वरा करा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version