spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MLC Election 2024 Voting : Mahayuti ची आघाडी ; मात्र Mahavikas Aghadi मध्ये ८ मतांची बिघाडी

काल म्हणजेच १२ जुलै २०२४ रोजी विधानपरिषद निवडणूका पार पडल्या. यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा हा जंगी समान होता. या सामन्यात महायुतीला विजयाची माळ मिळाली आहे. यात एकूण ११ जागांसाठी १२ उमेदवार अशी लढत रंगली होती. त्यापैकी ११ आमदारांचा विजय झाला आहे. दरम्यानच्या काळात विजयी उमेदवारांचे अनेकांनी स्वागत व शुभेच्छा दिल्या आहे. तर काही जणांनी खळबळ जनक वक्तव्यसुद्धा केली आहेत. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी काल निवडणूक (Vidhanparishad Election) पार पडली. या १२ वा उमेदवार मैदानात उतरवल्यामुळे निवडणूक अटीतटीची झाली. त्यात दोन्ही पक्ष आमचाच विजय होणार असा दावा करत होते. महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) काही मते फुटणार असा दावाही सत्ताधाऱ्यांकडून केला जात होता. लोकसभेत महायुतीचा पराभव झाला मात्र, विधानपरिषदेत मात्र अखेर महायुतीच (Mahayuti) अव्वल ठरली आहे. नववा उमेदवार जिंकून आणत महायुतीने मविआला धक्का दिला आहे. शिवाय यात काँग्रेसची आठ मतं फुटल्याचंही बोललं जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवारांनी (Ajit Pawar) काटेकोर रणनीती आखत विजय खेचून आणला. महायुतीने आपले सर्व ९ उमेदवार निवडून आणले. मविआचे दोन उमेदवार निवडून आले. तर शेकापच्या जयंत पाटलांचा (Jayant Patil) पराभव झाला. काँग्रेसची आठ मतं फुटली आहेत. चुरशीच्या ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) धोबीपछाड दिला.

भाजपचे पंकजा मुंडे (Pankaja Munde), अमित गोरखे (Amit Gorkhe), परिणय फुके (Parinay Fuke), योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) हे पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच निवडून आले. सदाभाऊ खोतांनाही (Sadabhau Khot) निवडून आणण्यात भाजपने यश मिळवलं. एकनाथ शिंदेंचे शिवसेना कृपाल तुमाने आणि भावना गवळी हे दोन्ही शिलेदार सहज निवडून आले. अजित पवारांनी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर या दोघांनाही निवडून आणलं. दुसऱ्या उमेदवारासाठी मताचा कोटा कमी पडत असतानाही त्यांनी ही किमया करून दाखवली.

काँग्रेसचे ८ आमदार फुटले त्यामुळे महायुतीचा फायदा :

काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा विजय झाला. पण काँग्रेसचे आठ आमदार फुटल्याने त्याचा फायदा महायुतीला झाला. मतांच्या फोडाफोडीवरून एकनाथ शिंदेंनी मविआला टोला लगावला आहे. लोकसभेत झालेल्या पराभवाचा वचपा विधान परिषदेत मविआला धोबीपछाड देत महायुतीने काढला आहे. पण खरी लढाई विधानसभेची आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांचाही विजय झाला. शेकापच्या जयंत पाटलांना पराभवाचा धक्का बसला आहे.

कोणत्या उमेदवाराला किती मते ? 

  • पंकजा मुंडे- २६
  • परिणय फुके- २६
  • अमित गोरखे- २६
  • सदाभाऊ खोत- २३
  • योगेश टिळेकर- २६
  • शिवाजीराव गर्जे – २४
  • राजेश विटेकर – २३
  • भावना गवळी – २४
  • कृपाल तुमाने – २५
  • मिलिंद नार्वेकर – २४
  • जयंत पाटील, शेकप – १२
  • प्रज्ञा सातव- २५

हे ही वाचा:

राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, CM Eknath Shinde यांनी स्वीकारला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : “Home guard जवानांना १८० दिवस काम देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करा” ; Satyajeet Tambe यांनी सभागृहात केली मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss