रिफायनरी प्रकल्पाबाबत मनसेची स्पष्ट भूमिका

बारसू रिफानरी संदर्भात बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, मुंबई-वडोदरा एक्स्प्रेसच्या नावाखाली मागच्या आठवड्यात गरीब आदिवासी लोकांच्या जमिनी बळजबरीने ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी महिलांवर लाठी हल्ला केला. काल अंधारात मुंबईतील आरे मधील शेकडो झाडे पोलीस बंदोबस्तात तोडली गेली

रिफायनरी प्रकल्पाबाबत मनसेची स्पष्ट भूमिका

बारसू रिफानरी संदर्भात बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, मुंबई-वडोदरा एक्स्प्रेसच्या नावाखाली मागच्या आठवड्यात गरीब आदिवासी लोकांच्या जमिनी बळजबरीने ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी महिलांवर लाठी हल्ला केला. काल अंधारात मुंबईतील आरे मधील शेकडो झाडे पोलीस बंदोबस्तात तोडली गेली. या घटना ताज्या असताना कालपासून कोकणाचा निसर्ग उध्वस्त करणाऱ्या बारसु रिफायनरीचा विरोध करणाऱ्या स्थानिक राहिवाशांवर पोलिसांनी दमदाटी सुरू केली आहे. कोकणातील राजापूरमधील बारसू येथे गेले तीन दिवस रिफायनरीवरून वाद निर्माण झाला आहे. प्रकल्पाच्या माती परीक्षणासाठी असलेला स्थानिकांचा विरोध पोलीस बळाचा वापर करून मोडून काढत मंगळवारी ड्रिलिंगचे काम सुरू करण्यात आले. यावेळी पोलिसांनी सुमारे ११० आंदोलकांना ताब्यातही घेतले. दरम्यान, याचे तीव्र पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटताना दिसून येत आहे. महाविकास आघाडी आणि भाजपा शिंदे गटातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत असताना मनसेनेही याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

मुंबईत माध्यमांशी बोलताना मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.कोकणातील प्रकल्पांबाबत राज ठाकरे यांनी यापूर्वीही भूमिका स्पष्ट केली आहे. कोकणात रोजगाराच्या संधी खूपच कमी उपलब्ध आहेत. त्यामुळे कोकणातील बरीचशी घरं आज रिकामी दिसतात. कारण येथील तरुण रोजगाराच्या शोधात मुंबईत येतात. त्यामुळे कोकणात पर्यटन आणि येथे पिकणाऱ्या काजू आणि आंब्यासारख्या पिकांवर प्रक्रिया करणारे प्रकल्प कोकणात आले पाहिजेत. यातून येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल”, अशी प्रतिक्रिया नितीन सरदेसाई यांनी दिली.

कोकणात अशा प्रकारचे प्रकल्प येत असताना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. मात्र, असं असलं तरीही येथील स्थानिकांना संपूर्णपणे विश्वासात घेऊन आणि त्यांच्यांशी चर्चा करून प्रकल्प आणले पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. तसेच ६ मे रोजी राज ठाकरे यांची रत्नागिरीत सभा होणार आहे. त्यावेळी याबाबतची सविस्तर भूमिका ते मांडतील”, असेल ते म्हणाले.यावेळी बोलताना त्यांनी रत्नागिरीत होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेबाबतही प्रतिक्रिया दिली. “राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना कोकणात दोन सभा घेणार असल्याचे सांगितले होते. त्यापैकी पहिली सभा ६ तारखेला रत्नागिरीत होणार आहे. पक्षस्थापनेनंतरची रत्नागिरीत होणारी पहिलीच सभा आहे. त्यामुळे या सभेबद्दल सर्वांनाच उत्सूकता आहे”, असे ते म्हणाले.

हे ही वाचा : 

एकनाथ शिंदे करतायत डबल ड्युटी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३ दिवसांच्या रजेवर? गेले की पाठवले? चर्चाना उदान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version