मनसेचं ठरलं? Amit Thackeray निवडणुकीच्या रिंगणात! पण लढणार कुठून?

मनसेचं ठरलं? Amit Thackeray निवडणुकीच्या रिंगणात! पण लढणार कुठून?

raj thackeray and amit thackeray

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुक लढण्याची आपली तयारी असल्याची इच्छा त्यांनी पक्षाच्या बैठकीत बोलून दाखवली आहे. त्याचवेळी आगामी निवडणुकीसाठी मुंबईमधील ३६ जागांचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला.

राजगड (Rajgad) येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray), मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgoankar), शिरीष सावंत (Shirish Sawant), संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांच्यासह अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी मुंबईतील ३६ जागांचा आढावा घेऊन या मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची माहिती घेऊन लवकरच मुंबईतील ३६ जागांबाबत एक सविस्तर अहवाल सादर करणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी अमित ठाकरे यांनी आपण विधानसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचे भाष्य केले. यासाठी मुंबईमधील तीन जागांबाबत अमित ठाकरे यांच्यासाठी चाचपणी केली जात असल्याची माहिती दिली जात आहे. या तीन जागांमध्ये भांडुप, माहीम तसेच मागाठणे या मतदारसंघांचा समावेश आहे.

सध्या महाविकास आघाडी  (Mahavikas Aghadi ) तसेच महायुती (Mahayuti) यातील घटकपक्षांनी मुंबईतील जास्तीत-जास्त जागा खेचण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. असे असताना महाविकास आघाडीमधून ठाकरे गट आणि काँग्रेस यांचा मुंबईवर दबदबा कायम राहू शकतो. महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेनेकडून मुंबईत जास्त जागा लढवल्या जाऊ शकतात. आता मनसेने केलेल्या स्वबळाच्या घोषणेमुळे अनेक ठिकाणी तिरंगी लढत होणार असं बोललं जात आहे. येणाऱ्या काळात वरळीतून संदीप देशपांडे, ठाण्यातून अविनाश जाधव, वडाळ्यामधून स्नेहल जाधव तसेच जोगेश्वरीमधून गजानन राणे निवडणूक लढवताना दिसून येण्याची शक्यता असताना आता अमित ठाकरे नेमक्या कोणत्या विभागातून निवडणूक लढवताना दिसतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रत्येकवेळी छातीत होणारी जळजळ,आंबट ढेकर होण्यामागे हे असू शकत कारण.
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version