‘नो टू हलाल’,भोंग्यानंतर मनसेने हाती घेतली नवी मोहीम

'मनसेच्या वतीने हलालची ही मक्तेदारी मोडून काढत वाल्मिकी आणि खाटीक समाजातील लोकांना त्यांचा व्यवसाय परत मिळवून देणे हा या लढ्यामागचा मुख्य उद्देश आहे.'

‘नो टू हलाल’,भोंग्यानंतर मनसेने हाती घेतली नवी मोहीम

मशिदींवरील लाऊडस्पीकरविरोधात प्रचार करणाऱ्या राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आता हलाल मांसाविरोधात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी एक पत्र जारी करत म्हटले आहे की, देशातील सर्वात मोठी दहशतवादी फंडिंग आणि जागतिक स्तरावर 7 ट्रिलियन अर्थव्यवस्था असलेल्या ‘हलाल’ विरोधात लढण्याची गरज आहे. यशवंत किल्लेदार म्हणाले की, इस्लाममध्ये ‘हलाल’ हा प्राणी मारण्याची अत्यंत क्रूर पद्धत आहे, त्यामुळे आता ‘नो टू हलाल’ मोहीम सुरू करणे अनिवार्य झाले आहे.

यशवंत किल्लेदार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, हिंदू, शीख आणि ख्रिश्चन धर्मातील लोकांमध्ये ‘झटका’ मांस खाल्ले जाते. हलाल पध्दतीने जनावरे मारण्याचा धंदा तेजीत आला असून, त्यामुळे मांस विक्री करणाऱ्या खाटीक व वाल्मिकी समाज नामशेष होत आहेत. या समाजाचा पारंपारिक व्यवसाय त्यांच्याकडून हिसकावून घेतला जात आहे, त्यामुळे इतर धर्माच्या लोकांना ‘हलाल’ पद्धतीने मांस चिरून खावे लागत आहे. ‘मनसेच्या वतीने हलालची ही मक्तेदारी मोडून काढत वाल्मिकी आणि खाटीक समाजातील लोकांना त्यांचा व्यवसाय परत मिळवून देणे हा या लढ्यामागचा मुख्य उद्देश आहे.’

यशवंत किल्लेदार पुढे म्हणाले की, ‘जमीअत उलेमा-ए-हिंदचा मांस व्यवसाय, तसेच चिप्स, बिस्किटे, लिपस्टिक, चॉकलेट आणि आईस्क्रीम इत्यादी शाकाहारी उत्पादनांमध्ये वाढ होत आहे आणि त्यातून मिळणाऱ्या नफ्याचा  थेट वापर दहशतवादी आणि देशविरोधी कारवायांमध्ये होत आहे.’ ते म्हणाले की, सर्वसामान्यांना हे देखील माहित नाही की ते ज्या कष्टाच्या पैशाने या वस्तू खरेदी करतात, तोच पैसा दहशतवाद पसरवण्यासाठी वापरला जातो आणि आपण सर्वांनी मिळून हलाल उत्पादने खरेदी करणे बंद केले पाहिजे. त्यामुळेच ‘नो टू हलाल’ मोहीम सुरू करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असून आपण सर्वांनी या संघर्षात सहभागी व्हायला हवे.

हे ही वाचा:

सोनाली कुलकर्णी साकारणार ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’

जाणून घेऊया… गणेश चतुर्थीचं महत्त्व

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version