भोंग्याचे चित्र ट्विट करत “उद्धव साहेब हेच नवं चिन्ह निवडा किमान…” मनसे नेते गजानन काळेंचा टोला

विधिमंडळातील एकनाथ शिंदे यांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली असून शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण जाण्याची शक्यता आहे.

भोंग्याचे चित्र ट्विट करत “उद्धव साहेब हेच नवं चिन्ह निवडा किमान…” मनसे नेते गजानन काळेंचा टोला

मुंबई : विधिमंडळातील एकनाथ शिंदे यांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली असून शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण जाण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण चिन्हासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात कायदेशीर लढाई होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्के देणे सुरूच आहे.

उद्धव ठाकरे आता पक्ष बांधणीसाठी प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार पदाधिकारी हे पक्षाचा राजीनामा देत आहे. त्यात शिवसेना पक्षाच्या चिन्ह बाबत मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. संपूर्ण राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा सुरू आहे त्यातच मनसेचे नेते गजानन काळे यांनी त्यांच्या ट्विटर हँडल वरून एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी भोंग्याचा एक फोटो पोस्ट करत म्हणाले की, ” उद्धव साहेब हेच नवे चिन्ह निवडा किमान दिवसातून पाच वेळा तरी वाजेल” अशा शब्दात गजानन काळे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

 

हेही वाचा :

Uddhav Thackeray live | माशाच्या डोळ्यातील अश्रू दिसत नाहीत : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी पक्षचिन्हवर पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले ते म्हणाले की, “शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत शिवसैनिकांमध्ये व सामान्य जनतेमध्ये संभ्रम तयार केला जात आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करावे असे आवाहन मी करतो. सुप्रीम कोर्टाने ११ जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीत शिवसेनेच्या बाजूने निकाल लागेल अशी मी आशा करतो. व माझा न्यायव्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे. संपूर्ण राज्यभरातून शिवसैनिक व सामान्य जनतेचे मला प्रेम मिळत आहे आणि यातूनच आम्हाला बळ मिळेल” अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

पक्षाच्या चिन्हाबाबत संजय राऊत यांची भूमिका

Exit mobile version