“मोरूच्या मावशीने मोठाच डल्ला मारला म्हणायचं” मनसैनिकाची पेडणेकरांवर बोचरी टीका

“मोरूच्या मावशीने मोठाच डल्ला मारला म्हणायचं” मनसैनिकाची पेडणेकरांवर बोचरी टीका

संजय राऊत यांच्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. एसआरए घोटाळ्याप्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर दादर पोलिसांनी आज पुन्हा किशोरी पेडणेकर यांची चौकशी केली. याबाबत जूनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला होता. आता हे प्रकरण राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहे. भाजपसह मनसेकडूनही पेडणेकरांवर टीका केली जात आहे.

यावरून मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट केलंय. त्यांनी लिहिलंय… ‘ मोरूच्या मावशीने मोठाच डल्ला मारला म्हणायचं. गोरगरीब झोपडपट्टीवासीयांसाठी असलेल्या एसआरए योजनेत स्वतःला घर व ६ गाळे .. मांजर लपून दूध पीत होती तर. या तर मुंबई पोखरणारी घुस निघाली असं म्हणायचं का आता?

हेही वाचा : 

गुजरातमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच आचासंहिता लागू, ‘या’ दिवशी मतदान होण्याची शक्यता 

या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणातील कॉमेडी क्वीन ‘भारती सिंग’… #किशोरीभव असं ट्विट गजाजन काळे यांनी केलंय.

दरम्यान, किशोरी पेडणकेरांवर ज्या गाळ्यांसदर्भाने आरोप झाले, त्या ठिकाणी म्हणजे गोमाता नगरमध्ये आज शनिवारी सकाळीच किशोरी पेडणेकर पोहोचल्या. त्यांच्या हातात मोठं कुलूप होतं. त्यांनी तेथील गाळेधारकांना तुम्ही कुणाकडून गाळे खरेदी केले, असा प्रश्न विचारला. यावेळी माध्यमप्रतिनिधींचे कॅमेरेही सोबत होते.

किशोरी पेडणेकर यांची पोलिसांकडून चौकशी, एसआरए घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल

किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया :

एका सामान्य महिलेला त्रास दिला जात असल्याचा आरोप पेडणेकर यांनी सोमय्यांवर केला. न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे, असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय. किशोरी पेडणेकर यांच्यावर सनसनाटी आरोप किरीट सोमय्यांनी खळबळ उडवून दिली होती. त्याला किशोरी पेडणेकर यांनी थेट प्रत्युत्तर दिलं आहे. जाणीवपूर्ण टार्गेट केलं जात असल्याचं टोला त्यांनी यावेळी लगावलाय.

Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या घणाघात, ”सरकारमध्ये ताळमेळ नाही, उद्योगमंत्र्यांकडून राज्यातील जनतेची दिशाभूल”

Exit mobile version