मनसेचे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंना प्रतिउत्तर

मनसेचे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंना प्रतिउत्तर

काल मुलुंड विधानसभेमध्ये (Mulund Assembly) महाप्रबोधन यात्रेमध्ये (Mahaprabodan Yatra) बोलतांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यावर आता मनसेच्या नेत्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मनसेचे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली आहे. इतकच नाही तर मीडियाशी संवाद साधताना महाजन यांनी सुषमा अंधारे यांचा एकेरी उल्लेखही केला आहे. सुषमा अंधारे काहीही बोलते. तिच्या मेंदूला काय नारू झालाय का? असा संतप्त सवाल प्रकाश महाजन यांनी केला आहे.

सुषमा अंधारेंची सभा कालच झाली. या बाईला काय बोलावं? मी बीड जिल्ह्यातील आहे. तीही बीड जिल्ह्यातील (Beed district) आहे. तिला बोलायला ठेवलंय, भुंकायला नाही. मेंदूला नारू झाला की काय तिच्या. काय बोलली ती?असा सवाल प्रकाश महाजन यांनी केला. कालच तिची सभा झाली.. इतके वर्ष महापालिकेत सत्ता असून मातोश्रीचा (Matoshree) मजला चढला नाही. पण कृष्णकुंजचा (Krishnakunj) मजला चढला, असं ती म्हणाली. हे बोलण्याआधी तिने आपल्या मालकाला विचारायला हवं ना. मी असं बोलू की नको हे विचारलं पाहिजे ना? असा सवालही त्यांनी केला. सुषमा अंधारेंमुळे उद्धव ठाकरेंना लवकरच महिलांच्या बंडाला सामोरं जावं लागणार आहे, अशी टीका करतानाच काल परवा मुसलमान झाल्यासारखं सुषमा अंधारे आदाब आदाब करत फिरतायत, असा हल्लाही त्यांनी चढवला. मातोश्री-२ (Matoshree-2) कशी झाली ते सांगावं? उद्धव ठाकरेंना सवाल करावा, असंही ते म्हणाले.

राज ठाकरे यांना पुत्रमोह आडवा येतोय, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली होती. त्यावरही त्यांनी टीका केली. सुषमा अंधारेना पुत्रमोह होऊ शकत नाही, कारण त्यांची वेगळी अडचण आहे, असं महाजन म्हणाले. तुमचे नेते पहाटेच भाजपच्या पाणवठ्यावर गेले होते.

हे ही वाचा : 

Akshaya Hardeek Wedding : आता हार्दिक अक्षयाला रोज म्हणणार “चालतंय की”… पहा #अहा वेडिंग फोटो

नाशिकमध्ये संजय राऊत यांची जोरदार फटकेबाजी

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version