लोकसभा निवडणुकीसाठी मनसे ॲक्टिव, आता बारामती मतदार संघासाठी कंबर कसली

लोकसभा निवडणुकीसाठी मनसे ॲक्टिव, आता बारामती मतदार संघासाठी कंबर कसली

ओबीसींचं राजकीय आरक्षण, पाऊस आणि इतर कायदेशीर पेचप्रसंगामुळे राज्यातील नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यातच, आता लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकाही २ वर्षांवर आल्या आहेत, या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष पक्षबांधणीला निघाले आहेत. मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी विदर्भाचा दौरा केल्यानंतर आज ते पुण्यात बैठक घेत आहेत. यावेळी, नगरसेवक वसंत मोरेंच्या नेतृत्वात काही जणांनी राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. तर, वसंत मोरेंना बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

हेही वाचा : 

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी – देवेंद्र फडणवीस

वसंत मोरे म्हणाले, आज मनसे पक्षात अनेकांचा पक्षप्रवेश होतोय. यात भोर, वेल्हे, मुळशी या भागातून कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत. आजच्या होणाऱ्या सर्व नियुक्ती आणि पक्षप्रवेश या बारामती लोकसभा मतदारसंघातील आहेत. त्यामुळे येत्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघात आमची ताकद वाढणार आहे, असं वसंत मोरे म्हणालेत. त्याचबरोबर मनसेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संतोष दसवडकर यांची निवड करण्यात आली आहे, असंही मोरेंनी सांगितलं. पुण्यात मनसे नेते वसंत मोरे यांनी आज शक्ती प्रदर्शन केलं. शक्ती प्रदर्शन करत वसंत मोरे पक्ष कार्यालयात आले. आज मनसेच्या पक्ष कार्यालयात राज ठाकरेंच्या उपस्थितीत अनेकांचा मनसेत प्रवेश झाला.

वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट

वसंत मोरेंची बारामती लोकसभा निरीक्षक पदी निवड झाल्यानंतर त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली होती. साहेबांनी सांगितले ना तर बारामतीच काय दिल्लीला पण धडक देऊ…कारण मराठ्याची जात कधी मागं पुढं बघत नाय…आणि हो बारामती लोकसभा म्हणजे फक्त बारामती नाय बाबांनो, त्यात भोर , वेल्हा , मुळशी , पुरंदर , हवेली , दौंड , इंदापूर आणि पुणे शहर हे ही आहे बरं का…म्हणून तर म्हणलो मी येतोय…, असं वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं.

युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करा, शेतकऱ्यांना मदत द्या; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

Exit mobile version