spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो’ म्हणण्याचा अधिकार उरला नाही’; मनसैनिकाचे ठाकरेंना पत्र

दसरा मेळाव्यासाठी आता अगदी काही तास शिल्लक आहेत. शिवसेनेत दोन गट पडल्याने यंदा इतिहासात पहिल्यांदाच सेनेचे दोन दसरा मेळावे होणार आहेत. शिंदे गटाला परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी बीकेसीवर मेळावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आता जोरदार तयारी सुरु झाली आहे. दोन्ही गट यावेळी शक्तीप्रदर्शन करणार आहे. त्यासाठी नियोजन सुरु आहे. यानिमित्ताने मनसेने उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये मनसेने त्यांना आठ प्रश्न विचारले आहेत. तसंच तुम्हाला “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो” हे म्हणण्याचा अधिकार नाही, अशी टीकाही केली आहे.

हेही वाचा :

Dasara Melava : अमृता फडणवीसांचे मोठं वक्तव्य म्हणाल्या, एकनाथ शिंदे माझे फेवरेट आहेत…

उद्धवजी, उद्या शिवतीर्थावर “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो” म्हणण्याआधी या प्रश्नांची उत्तरं द्या.

१. मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादी या बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विरोधी विचार असणाऱ्या पक्षांशी युती का केली?

२. PFI सारखी संघटना पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देत असताना आपण काहीही न बोलता शांत का बसलात?

३. एमआयएम सपा सारख्या पक्षांसोबत दोन चार मतांसाठी हातमिळवणी का केली?

४. सत्तेत असतानाही औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण का रोखलं नाही?

५. मशिदीवरील भोगं उतरले पाहिजेत हा बाळासाहेबांचा विचार असताना त्यासाठी केलेल्या आंदोलनात महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे का दाखल केले?

६. बाळासाहेबांचा जनाब असा उल्लेख करून त्यांच्या हिंदुत्ववादी प्रतिमेला डाग का लावलात?

७. अजान स्पर्धा आयोजित करून कुठल्या हिंदुत्वाची उभारणी केली?

८. आपलं सरकार जाणार हे दिसल्यावरच औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं हे कसं सुचलं?

साहजिकच या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे नसणार. त्यामुळे माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हे म्हणण्याचा आणि बाळासाहेबांचा वैचारिक वारसा सांगण्याचा तुम्हाला अधिकारच उरला नाही. असे या पत्रात म्हटले आहे.

विभागप्रमुखांनी प्रश्न विचारुन युवासेनेच्या कार्यपद्धतीवर व्यक्त केला राग

तर दुसरीकडे शिंदे गटाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील आमंत्रण दिलं जाणार असं बोललं जात होतं. पण ही शक्यता आता मावळली आहे. कारण दसऱ्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष हे मुंबईत नसणार आहेत. दसऱ्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्यात असणार आहे. शिवसेनेचा शिवाजी पार्क मैदानावर तर शिंदे गटाचा बीकेसी मैदानावर दसरा मेळावा होणार आहे. पण या रणधुमाळीच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र पुण्यात असणार आहेत.

लग्नासाठी जोडीदार निवडताना ‘या’ ३ चुका करू नका

Latest Posts

Don't Miss