मनसेने केले स्पष्ट, आगामी निवडणूका…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काही महत्वाचे नेते आणि पदाधिकारी यांच्यामध्ये आज बैठक झाली.

मनसेने केले स्पष्ट, आगामी निवडणूका…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काही महत्वाचे नेते आणि पदाधिकारी यांच्यामध्ये आज बैठक झाली. त्यावेळी येणाऱ्या आगामी काळातील लोकसभा निवडणुकीला महाराष्ट्र नवनिर्मण सेना स्वबळावर सामोरे जाणार असल्याचं नितीन सरदेसाई यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी स्वबळावर हा शब्द वापरला आहे. मात्र यावेळी कोणत्याही पक्षासोबत युती करण्याचा निर्णाय पक्ष प्रमुख घेतील असे त्यांनी सांगितले आहे. मनसे भाजप-शिवसेनेच्या साथीने लढण्याच्या सर्व चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे.

गेले काही दिवस महाराष्ट्राच्या विविध लोकसभा मतदारसंघांमध्ये मनसे नेते, सरचिटणीसांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह आढावा बैठका सुरु आहेत. गणपतीनंतर बैठका पुन्हा सुरु होतील. मतदारसंघातील एकंदरीत वातावरणाची माहिती राज ठाकरेंनी घेतली अशी माहिती नितीन सरदेसाई यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील वातावरण सध्या मनसेसाठी पोषक आहे. राज ठाकरे यांनी मतदारसंघनिहाय आढावा घेतला. युतीबाबत अजून कुठलीही चर्चा नाही. स्वबळावर लढण्याच्या दृष्टीनेच आमची तयारी सुरु आहे, हे राज ठाकरेंनी वेळोवेळी सांगितलंय. त्यांनी स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद जाणून घेतली, ती वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. कुठल्याही युतीबाबत राज ठाकरे निर्णय घेतील, असे नितीन सरदेसाई म्हणाले आहेत.

Exit mobile version