MNS LIVE राज ठाकरे यांनी केले थेट जनतेला आवाहन बदल हवे असतील तर …

मनसेप्रमुख राज ठाकरे आज पनवेलमध्ये सकाळी ११ वाजता पक्षाचा निर्धार मेळावा घेणार आहेत. यात राज ठाकरे यांचे जाहीर भाषण देखील होणार आहे.

MNS LIVE राज ठाकरे यांनी केले थेट जनतेला आवाहन बदल हवे असतील तर …

मनसेप्रमुख राज ठाकरे आज पनवेलमध्ये सकाळी ११ वाजता पक्षाचा निर्धार मेळावा घेणार आहेत. यात राज ठाकरे यांचे जाहीर भाषण देखील होणार आहे. या मेळाव्यात मुंबई-गोवा महामार्गासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना एल्गार पुकारणार असल्याचे मनसेकडून जाहीर करण्यात आले आहे. यासंबंधिच्या पोस्टर्समध्ये ‘रखडेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेचा निर्धार मेळावा’ असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आजच्या भाषणात राज ठाकरे महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला अल्टीमेटम देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय राज ठाकरे मेळाव्यात काय बोलतात, कुणावर टीकेची झोड उठवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे या भाषणा दरम्यान राज ठाकरे कोणावर टीका करणार आहेत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भाषणाला सुरवात करताच रस्त्यांच्या विषयावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, देशाने पाठवलेल्या चांद्रयानावर पहिले झोड घेतली. आधी आपल्या राज्यात इतके खड्डे आहेत ते बघा आणि मग नंतर चंद्रावर किती खड्डे आहेत हे दिसेलच अशी टीका देखील केली आहे. आणि राज्यातले महत्वाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. मी इथे आलोय ते म्हणजे हिरवा झेंडा दाखवायला. असे देखील राज म्हणाले. चांद्रयान आठवून महाराष्टच्या जनतेला काही उपयोग नाही. अशी टीका देखील केली. आणि त्याचबरोबर जेवढा पैसा हा चांद्रयानासाठी चर्चा केला त्यापेक्षा हाच पैसा महाराष्ट्रातल्या खड्यांसाठी घातला असता तर सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा झाला असता असे देखील राज ठाकरे म्हणाले. तसेच आत्तापर्यंत जेवढ्या सत्ता महाराष्ट्र्रात आल्या आहेत त्यांना तुम्ही दरवेळेस निवडून देता त्यांना तुम्हाला एकदा तरी धडा शिकवावा असे नाही का वाटले? असा सत्ताधार्यांना आणि केंद्रातील बड्या नेत्यांना टोमणा लगावला आहे. जनतेला राज ठाकरे यांनी थेट प्रश्न विचारला विचारला आहे. निवडणुकीच्या तोंडावर आश्वासन देतात आणि मग नंतर कोणतेही काम करण्यात येत नाही तरी देखील जनता हि त्याच लोकांना निवडून देते.

अमित ठाकरेंसोबत चा घडलेला प्रारकाराची ग्वाही देत भाजपने सूर छेडलं होता त्यावर राज ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना म्हणाले भाजपने पहिल्यांदी स्वतःचे आमदार न फोडता स्वतः पक्ष उभा करायला देखील शिकले पाहिजे. लोकांच्या पक्षात येण्यास भाग पाडून पक्षफोडी करायची. तसेच अजित पवारांची नक्कल करताना अजित पवारांवर खोटे बोलू नका असे देखील राज म्हणाले. अजित पवार हे महाराष्ट्राच्या विकासासाठी सत्तेत बसले आहेत.असे वारंवार सांगत असतात पण हे कितपत सत्य आहे हे देखील तुम्हला माहित आहे परंतु जनता हे बोलून दाखवत नाही. त्यामुळे महाराष्ट्र्राच्या सत्तेमध्ये निर्लज्ज पणाचा कळस गाठला आहे हे नक्की आहे. तसेच जर तुमहाला खरंच बदल घडवायचे असतील तर मला नक्की निवडून द्या असे थेट आवाहन राज ठाकरे यांनी जनतेला केले आहे. बदल घडवायचा असेल तर एकदा माझ्या हाती सत्ता देऊन बघा असे आवाहन जनतेला या भाषणातून थेट केले आहे. या मेळाव्यात मुंबई-गोवा महामार्गासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना एल्गार पुकारणार असल्याचे मनसेकडून जाहीर करण्यात आले आहे. यासंबंधिच्या पोस्टर्समध्ये ‘रखडेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी हा मनसेचा निर्धार मेळावा’ असल्याचे राज ठाकरेम्हणाले आहेत. त्यामुळे आजच्या भाषणात राज ठाकरे महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला अल्टीमेटम देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नितीन गडकरी यांच्याशी फोन वरून चर्चा केल्यानंतर समृद्धी महामार्गाला फेन्सिंग घातलेली नाही. रस्त्यावर जनावरे येत असतात, तेव्हा त्याला काय करावं. चारशे दिवस झाले रस्ता लोकांसाठी खुला करुन दिला आहे. आतापर्यंत साडेतीनशे लोक मृत्यूमुखी पडलेत. तेथे काम केलं नाही, पण टोलनाका उभा केला आहे. म्हणजे इथे टोल भरा आणि मरा, अशी परिस्थिती असल्याचं राज म्हणाले. जवळपास ४०० ते ४५० दिवस झाले असतील समृद्धी महामार्गाचा रसता खुला झाला आहे आणि साधारण ३५० माणसे हि मृत्यूमूही पडली आहेत. यासंदर्भात नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधला आहे. मुंबई- गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत व दुरावस्थेबाबत राज ठाकरे आजच्या निर्धार मेळाव्यात आपली रोखठोक भूमिका मांडून आपली पुढील राजकीय दीशा स्पष्ट करण्याची शक्यता आहे. ज्याप्रमाणे मनसेने टोलनाक्याचे आंदोलन आक्रमकपणे हाताळले, त्याप्रमाणेच महामार्गाबाबतही मनसे आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. सरकारी कार्यालयांना घेराव घालणे किंवा राज ठाकरे यांच्याकडून महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी अल्टिमेटम मिळण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. मुंबई-गोवा या रस्त्यावर आतापर्यंत १५ हजार ५६६ कोटी रुपये खर्च झाला आहेत. या संदर्भात बोलत असताना आणखीन एक नवीन विषयाला हात घालून मधेच राजकारणामध्ये बरसू प्रकरण उखरून काढले आहेत. कोकणातील जमिनी इतरांच्या घश्यात चालल्या आहेत. नाणार प्रकल्प रद्द होतोय म्हटल्यावर लगेच बारसू प्रकल्प आला. इथे कोणी जमिनी घेतल्या, कोणाच्या नावावर पाच हजार एकर जमीन घेतली. आपलीच लोक आहेत.. कुंपण शेत खातंय… आपल्या कोकणी लोकांना फसवून दुसऱ्याच्या घशात घालतात.

हे ही वाचा:

आंदोलनात साथ द्या आणि सत्ताधार्यांना…. राज ठाकरे

महाविकास आघाडीत संभ्रम नसल्याचं संजय राऊतांनीही स्पष्ट केलं, सुप्रिया सुळे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version