Wednesday, September 25, 2024

Latest Posts

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अजित पवार गटावर टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अजित पवार गटावर टीका

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राचा राजकारणात अनेक नव नवीन बदल पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी बंडखोरी केली. आणि राष्ट्रवादी पक्षाचे वरिष्ठ नेते अजित पवार हे त्यांच्या काही आमदारांसह महायुतीत सहभागी झाले आहेत. आम्ही राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात आहोत असा दावा अजित पवार आणि त्याचे आमदार यांनी करत सरकार मध्ये प्रवेश केला आहे. मग भाजपशी हात मिळवणी का केली? आणि शरद पवारांशी बंडखोरी का केली या सारखे अनेक प्रश्न अजित पवार आणि त्यांचा आमदारांना विचारले जात होते. पत्रकारांच्या या प्रश्नावर त्याचा या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले ” आम्ही महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी सत्येत सहभागी झालो आहोत असे सांगितलं आहे”. अजित पवारांचा या वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवार गटावर टीका केली आहे.

पनवेलचा वासुदेव बळवंत फडके सभागृहात महाराष्ट्र नव निर्माण सेनेने मुंबई गोवा महामार्गासाठी निर्धार मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेनी भाजप सह राष्ट्रवादी चा अजित पवार गटावर जोरदार टीका केली आहे. तसेच या वेळी राज ठाकरे यांनी अजित पवारांची टिंगल उडवली. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले “अजित पवारांना विचारलं कि आपण या सरकार मध्ये का आलात? त्यावर ते म्हणाले ” महाराष्ट्राचा विकास करायला आलोय”, असे अजित पवारांनी सांगितले. ६ दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले ” महाराष्ट्रात ७० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे”. मग हे सगळं जण आत्ता भाजप बरोबर आले आहेत. कारण आत्ता छगन भुजबळांनी अजित पवारांना सांगितलं असणार असे नरेंद्र मोदी म्हंटले आहेत. आत्ता तुरुंगात गेल्या वर काय काय असत? आपण हवं तर भाजपा बरोबर जाऊ पण तिकडे तुरुंगात नको असे वक्त्यव्य केले आहे.

हे ही वाचा:

‘काळम्मावाडी धरणाच्या गळतीसाठी निधी देण्यात येणार’, अजित पवार

टोलनाकासंदर्भात Amit Thackeray वर टीका करणाऱ्या भाजपाला Raj Thackeray नी दिले प्रत्युत्तर, म्हणाले…

आंदोलनात साथ द्या आणि सत्ताधार्यांना…. राज ठाकरे

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss