मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई गटध्यक्ष मेळावाच्या सभास्थळी रवाना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई गटध्यक्ष मेळावाच्या सभास्थळी रवाना

मुंबई महापालिका निवडणूक (Mumbai Mahapaika Election 2022) जवळ येत आहे.अशात सगळेच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेत. मनसेनेदेखील मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केलीय. तर आज राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत मनसेचा मेळावा होतोय. यात आगामी पालिका निवडणुकीची रणनिती ठरवली जाणार आहे. मुंबई गोरेगावमधील नेस्को मैदान मनसैनिकांनी भरला आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते सभास्थळी उपस्थित राहून राज ठाकरेंची प्रतीक्षा करत आहेत.

हेही वाचा : 

लॉकडाऊनला विरोध करत, हुकूमशाही नको, लोकशाही हवी असा म्हणत, चीनमध्ये जिनपिंग यांच्या विरोधात लोक रस्त्यावर

या मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) आगामी महापालिका निवडणुका तोंडावर ठेवून नव्या उपक्रमांबद्दल काय माहिती देतात? याकडे अनेकांचं लक्ष असणार आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या आजच्या भाषणात ते कुणावर निशाणा साधतात? हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. मुख्य म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलंय. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. त्यामुळे राज ठाकरे राज्यपाल आणि राहुल गांधी यांच्या विधानांवर काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (EKnath shinde ), मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत. त्यामुळं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळं आज राज ठाकरे पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याचीही शक्यता आहे. पण या मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कोणता मंत्र देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

MS Dhoni , पांडे बंधू एकत्रित पार्टीमध्ये काला चष्मा या गाण्यावर थिरकले

राज ठाकरे यांच्या उत्तर मुंबईतील मागाठाणे आणि चारकोप विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून दौऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात मराठी भाषिक मतदार निर्णायक भूमिका बजावतात. २००७ मध्ये मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीत मनसेने पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती आणि ७ जागा जिंकल्या. त्यानंतर २०१२च्या महापालिका निवडणुकीत २७ जागा आणि २०१७ च्या निवडणुकीत फक्त ७ जागा जिंकल्या होत्या.

Exit mobile version