spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारपासून नाशिक दौऱ्यावर

मागील महिनाभरापासून नाशिक शहराला राजकीय महत्व वाढले आहे.

मागील महिनाभरापासून नाशिक शहराला राजकीय महत्व वाढले आहे. १२ जानेवारीला पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर अनेक नेत्यांनी नाशिक दौरा केला. २२ जानेवारीला अयोध्यातील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन आरती आणि दर्शन घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी महिनाभरात नाशिक दौरा केला आहे. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने राहिले आहेत. निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राज ठाकरे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिक दौरा करणार आहेत. ते चार दिवस नाशिकमध्ये राहणार आहेत. मनसे नेते २००८ साली निवडणूक जिंकून आले होते. त्यावेळी मनसेचे तीन आमदार निवडून आले होते. २०१२ साली नाशिक महापालिकेत मनसेचे तब्बल ४० नगरसेवक निवडून आले होते. नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये राज ठाकरे चार दिवस असणार आहेत. १ ते ४ फेब्रुवारी असा राज ठाकरे यांचा दौरा असणार आहे. मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर तयारीला लागा मी येतोय, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या टप्प्यातील ‘भारत जोडो यात्रा’ मणिपूरमधून सुरू झाली आहे. मार्च महिन्याच्या शेवटी भारत जोडो यात्रा नाशिकमध्ये पोहचणार आहे. ही यात्रा मुंबईमध्ये संपणार आहे. त्यामुळे सध्या राहुल गांधी यांच्या कार्यक्रमांचे नियोजन सुरू आहे. यात्रेचा शेवटचा टप्पा मुंबई असून, नाशिकमधून ही यात्रा मार्गक्रमण करणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

बदामाचे अतिप्रमाणात सेवन केल्याने शरीरावर होतात ‘हे’ दुष्परिणाम

अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार, जरांगेंची मोठी घोषणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss