मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच होणार पुन्हा ॲक्टिव्ह

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) आपल्या हिप बोनच्या शस्त्रक्रियेनंतर आता लवकरच ॲक्टिव मोडमध्ये पाहायला मिळणार आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच होणार पुन्हा ॲक्टिव्ह

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) आपल्या हिप बोनच्या शस्त्रक्रियेनंतर आता लवकरच ॲक्टिव मोडमध्ये पाहायला मिळणार आहेत. कारण लवकरच राज ठाकरे पदाधिकारी मेळावा घेणार आहेत. येत्या सोमवारी म्हणजेच २३ ऑगस्ट रोजी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. तर २३ ऑगस्टला मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडणार आहे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने या बैठकांना विशेष महत्त्व आहे.

मागच्या काही दिवसांत राज्यातील राजकारणात एक वेगळेच चित्रपहाय्ला मिळत होते. त्यामध्ये मनसेची भाजपसोबतची जवळीकता वाढली असे चित्र देखील वारंवार दिसून येत होते. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच ॲक्टिवह मोडमध्ये येणार आहेत परंतु हे भाजप आणि मनसे ही जवळीक कायम ठेवणार की एकला चलो रेची भूमिका घेणार हे पाहणं म्हणत्वाचे आहे. कारण दोन महिन्यांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर शिवसेनासोबत नसल्यामुळे निर्माण झालेली मराठी मतांची पोकळी शिंदे सेनेमुळे आता पूर्ण होणार आहे. त्यामुळे भाजपच्या भूमिकेकडे मनसेचे देखील लक्ष असणार आहे.

राज ठाकरे यांच्यावर २० जून रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालात हिप बोनची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार मागील दोन महिने राज ठाकरे विश्रांती घेत असल्याची माहिती होती. मात्र आता पुन्हा एकदा राज ठाकरे राजकारणात ॲक्टिव मोडमध्ये आले आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज ठाकरे मुंबईत २२ तारखेला प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत आणि त्यांनतर पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. तर २३ तारखेला राज्यभरातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत १०० वॉर्ड वर मनसे लक्ष केंद्रित करणार आहे. यासोबतच ठाणे, पुणे आणि नाशिक महापालिकेवर देखील सत्तेच्या समीकरणात मनसे असेल असा विश्वास पक्षाला आहे. याचसाठी उद्धव ठाकरे यांच्या आधी राज ठाकरे दौऱ्यावर निघण्याची शक्यता आहे.

 

हे ही वाचा :-

राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधींची भावूक पोस्ट म्हणाले, पापा आप हर पल मेरे साथ…

‘मुंबई पालिकेवर भाजपा-शिवसेना युतीचाच झेंडा दिसणार’ ,देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

 

Exit mobile version