मोठी बातमी! वसंत मोरेंवर राज ठाकरेंनी सोपवली थेट सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघाची जबाबदारी

आता मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांना नवीन जबाबदारी दिली आहे

मोठी बातमी! वसंत मोरेंवर राज ठाकरेंनी सोपवली थेट सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघाची जबाबदारी

आगामी 2024 च्या निवडणुकांसाठी प्रत्येक पक्ष हा आपल्या परीनं तयारीला लागला आहे. त्यात आता मनसे पक्षही अँक्शन मोडमध्ये आला आहे. मनसे पक्ष लोकसभेच्या तयारीसाठी सक्रीयपणे कामाला लागला आहे. हल्लीच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी पक्षांचे नेते आणि सरचिटणीसांची महत्वपूर्ण अशी बैठक घेतली आहे. या बैठकीत मनसेने लोकसभा मतदारसंघ निरीक्षक नेमले आहेत. तसेच मावळ, शिरूर आणि बारामती या महत्वाच्या ग्रामीण लोकसभा संघांची जबाबदारी पुण्याच्या आमदारांवर सोपवण्यात आली आहे.

सध्या राज ठाकरे यांची सही असणार पत्र जारी करण्यात आले आहे. ज्यात मावळ भागासाठी किशोर शिंदे, हेमंत संभूस आणि गणेश सातपुते यांची निवड करण्यात आली आहे. तर, शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी अजय शिंदे, बाळा शेडगे आणि बारामती मतदारसंघासाठी वसंत मोरे, सुधीर पाटसकर आणि रणजित शिरोळे यांनी निवड करण्यात आली आहे. तर, पक्षाच्या स्थापनेपासून राज ठाकरेंबरोबर असणाऱ्या वसंत मोरे यांच्यावर पुण्यातील कात्रज मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पुणे मनसे येथील संघात्मक बदलामुळे मनसेतील अनेक वाद चव्हाट्यावर आले होते. त्यामुळे वसंत मोरे मनसे पक्ष सोडणार अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. त्यामुळे मनसे आणि शिवसेनेसारख्या अनेक पक्षांनी त्यांना आपल्या पक्षात सामील होण्याचे आमंत्रण दिले होते. मात्र, राज ठाकरेंना वसंत मोरे यांची समजूत काढण्यात यश आले आणि वसंत मोरे देखील त्यांच्याशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे आता मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांना नवीन जबाबदारी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या वसंत मोरे यांना थेट सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. वसंत मोरे यांना नवी जबाबदारी देत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केल्याचे दिसून येत आहे. मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज मुंबईत पार पडली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.

हे ही वाचा: 

रतन टाटा यांचा ‘गुडफेलोज’च्या माध्यामतून सामाजिक  उपक्रम

मालकासह डिलिव्हरी करण्यासाठी फिरणाऱ्या कुत्र्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

Exit mobile version